तंबाखूच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला ऐंशी हजाराचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:00+5:302021-09-15T04:32:00+5:30
लक्ष्मण ऐनापुरे दुचाकीवरून म्हैसाळकडे जात होते. त्यांनी दुचाकीच्या हॅन्डलला ८० हजारांची रक्कम असलेली पिशवी अडकवली होते. म्हैसाळ रस्त्यावर ते ...

तंबाखूच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला ऐंशी हजाराचा चुना
लक्ष्मण ऐनापुरे दुचाकीवरून म्हैसाळकडे जात होते. त्यांनी दुचाकीच्या हॅन्डलला ८० हजारांची रक्कम असलेली पिशवी अडकवली होते. म्हैसाळ रस्त्यावर ते पेट्रोलपंपाजवळ झाडाखाली लघुशंकेसाठी थांबले. यावेळी ते तंबाखू मळत असताना तेथे अनोळखी महिला आली. तिने त्यांना तंबाखू मागितली. त्यांनी महिलेस तंबाखू दिल्यानंतर तिने तंबाखू खाण्याचा बहाणा केला. यावेळी महिलेच्या पाठोपाठ आलेल्या दोन अनोळखींनी ऐनापुरे यांना बोलण्यात गुंतविले. यादरम्यान दुचाकीला अडकवलेली पैशांची पिशवी घेऊन महिलेसह अन्य दोघे पसार झाले. दुचाकी सुरू करताना ऐनापुरे यांना पैशांची पिशवी गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आसपास शोध घेतला, मात्र ती मिळून आली. तंबाखू खाण्याच्या बहाण्याने महिलेने व तिच्या दोघा साथीदारांनी ८० हजार रुपयांना चुना लावल्याचे ऐनापुरे यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.