आठवलेंना मंत्रीपदाने जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 00:15 IST2016-07-05T23:44:38+5:302016-07-06T00:15:38+5:30

साखर वाटप : आटपाडी, जत, मिरज शहरात मिरवणुका

Eighth Venue Comptroller | आठवलेंना मंत्रीपदाने जल्लोष

आठवलेंना मंत्रीपदाने जल्लोष

सांगली : केंद्रीय मंत्रिमंडळात खा. रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. यानिमित्त साखर वाटप, फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणुका काढण्यात आल्या. मिरजेसह जत, आटपाडी तालुक्यात जल्लोष करण्यात आला.
मिरज : केंद्रीय मंत्रिमंडळात खा. रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर मिरजेत रिपाइं कार्यकर्त्यांनी साखर वाटून व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. मंगळवारी दुपारी खा. आठवले यांच्या शपथविधीनंतर मिरजेतील किसान चौकात रिपाइं कार्यकर्ते एकत्रित आले. दलित व बहुजनांना मंत्री आठवले यांच्याकडून न्याय मिळेल, असे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
जिल्हा उपाध्यक्ष पोपट कांबळे, प्रकाश इनामदार, सतीश जाधव, अरविंंद कांबळे, सावित्री कांबळे, आनंदराव हातेकर, प्रभाकर नाईक, नीतेश वाघमारे, प्रमोद वायदंडे, हरीष कोलप, विश्वास खांडेकर, दीपक कडाले, मनोज कांबळे, अमित कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी साखर व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. सांगली जिल्ह्यात मंत्री आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे रिपाइं पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आटपाडी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आटपाडीत रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटून, फटाके फोडून जल्लोष केला. खा. आठवले यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रिपाइंचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली येथील मुख्य व्यापारी पेठेतून पंचायत समिती कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बंडोपंत देशमुख, स्नेहजित पोतदार, दत्तात्रय पाटील, सुहास देशमुख, सादिक खाटिक, नंदकुमार पवार, शरद वाघमारे, विवेक सावंत, लक्ष्मण मोटे, श्रीकृष्ण सावंत, साहेबराव चंदनशिवे, दीपक सावंत, सचिन सावंत, मारुती ढोबळे, विशाल काटे, रवी काटे, शशिकांत मोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Eighth Venue Comptroller