करगणीत लांडग्यांच्या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:26+5:302021-09-06T04:30:26+5:30
मेंढपाळ मल्लाप्पा पडवळे, नवला मुरारी कोळेकर, शंकर बंडगर, संदीप खांडेकर यांचा तळ सध्या तडवळे येथील दत्तात्रय नामदेव शेंडे यांच्या ...

करगणीत लांडग्यांच्या हल्ल्यात आठ मेंढ्या ठार
मेंढपाळ मल्लाप्पा पडवळे, नवला मुरारी कोळेकर, शंकर बंडगर, संदीप खांडेकर यांचा तळ सध्या तडवळे येथील दत्तात्रय नामदेव शेंडे यांच्या हुंबरवाडा नावाच्या मळ्यात आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला झाला. मेंढरांच्या संरक्षणासाठी लावलेली (जाळे) वागर तोडून लांडग्यांनी कळपात प्रवेश केला. मोठी पाच मेंढरे व तीन लहान पिल्लांना त्यांनी ठार केले; तर पाच मेंढरे बेपत्ता आहेत. मेंढरांच्या ओरडण्याने मेंढपाळ जागे झाले. त्यांनी लांडग्यांना हुसकावले. यावेळी काही लांडग्यांनी बकऱ्या तोंडात धरून घेऊन पळ काढला. वनपाल पांडुरंग बाळू बालटे, वनरक्षक अंबिका तळे, सुखदेव माळी, वनमजूर जितेंद्र गिड्डे, डॉ. लक्ष्मण गाढवे, डॉ. अविनाश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.