कुपवाड एमआयडीसीतील बीअरबारमध्ये आठ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:29 IST2021-05-20T04:29:25+5:302021-05-20T04:29:25+5:30

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील एका बीअरबारमधील विदेशी दारूच्या बाटल्या व इलेक्ट्रॉनिक वस्तू असा आठ लाख सात हजार ७१४ रुपयांची ...

Eight lakh stolen from beer bar in Kupwad MIDC | कुपवाड एमआयडीसीतील बीअरबारमध्ये आठ लाखांची चोरी

कुपवाड एमआयडीसीतील बीअरबारमध्ये आठ लाखांची चोरी

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील एका बीअरबारमधील विदेशी दारूच्या बाटल्या व इलेक्ट्रॉनिक वस्तू असा आठ लाख सात हजार ७१४ रुपयांची चोरी झाल्याची तक्रार बुधवारी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. एमआयडीसी पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कुपवाड एमआयडीसीतील एका बीअरबारमधून गुरुवारी ६ मे २०२१ ते मंगळवार १८ मे २०२१ दरम्यान अज्ञात इसमाने विदेशी दारूच्या बाटल्या व इलेक्ट्रॉनिक वस्तू असा आठ लाख सात हजार ७१४ रुपयांची चोरी केल्याचे बुुधवारी दुपारी उघडकीस आले. अज्ञाताने मागील बाजूस असलेल्या ग्रीलचा कोयंडा तोडून चोरी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानुसार हाॅटेल मालक रघुनाथसिंह राजपूत यांनी कुपवाड पोलिसांत चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे तपास करीत आहेत.

Web Title: Eight lakh stolen from beer bar in Kupwad MIDC