Efforts for the development of Narsewadi village | नरसेवाडी गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील

नरसेवाडी गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील

खानापूर विधानसभा मतदारसंघातील नरसेवाडी (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्या नूतन सदस्यांचा सत्कार माजी आ. पाटील यांच्याहस्ते विटा येथे करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, स्थानिक पातळीवर राजकीय व सामाजिक स्तरावर काम करीत असताना अनेक अडचणी येतात. परंतु, गट-तट व राजकारण बाजूला ठेवून नरसेवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून आदर्श निर्माण केला आहे. या गावच्या काहीही अडचणी व समस्या असतील, तर त्या सोडविल्या जातील.

शर्मिला सिध्दनाथ जाधव, मंगल गुरव, संदीप सूर्यवंशी, मनीषा जाधव, कांचन जाधव, सुनील जाधव या नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा माजी आ. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष सावकर यशवंत जाधव, गटप्रमुख सिध्दनाथ जाधव व गणेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बी. आर. पाटील, महादेव जाधव, भीमराव जाधव, बाळासाहेब लावंड, शिवाजी जाधव, अंकुश जाधव, सागर जाधव, शंकर सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, गणेश जाधव, बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, लहू जाधव उपस्थित होते.

फोटो - २१०१२०२१-विटा-नरसेवाडी :

विटा येथे नरसेवाडी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध नूतन सदस्यांचा सत्कार माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बी. आर. पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Efforts for the development of Narsewadi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.