शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जाती-धर्माची मोट विस्कळीत करण्याचे प्रयत्न सुरु - तारा भवाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:21 IST

वारी भांडवलशाही होत असल्याची टीका

सांगली : महाराष्ट्रातील वारकरी संतांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. अंधश्रद्धेतून गरिबांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी झटले. वारकरी चळवळीने सर्व जाती-धर्मांची मोट बांधली. ही मोट विस्कळीत करण्याचे प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पुरोगामी चळवळीने यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, असे प्रतिपादन ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.सांगलीत गुरुवारी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ व ‘वारकरी संप्रदायातील स्त्री संत’ या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. कार्यक्रमाला अंनिसचे हमीद दाभोलकर, संत साहित्यांचे अभ्यासक सचिन परब, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सुभाष पाटील, साहित्यिक डॉ. अनिल मडके, अंनिसचे राहुल थोरात आदी उपस्थित होते.डॉ. भवाळकर म्हणाल्या, पूर्वी ग्रामसंस्कृती जातीभेदाने बुजबुजली होती. व्यक्तीच्या जातीनुसार त्याची कामे ठरायची. अशा श्रमकऱ्यांचे प्रतीक म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल होता. महाराष्ट्रातील वारकरी संत हे एकाच वेळी उच्चवर्णीयांच्या अहंकाराला आव्हान देत लढत होते. त्याचबरोबर गरीब लोकांतील अंधश्रद्धेविरुद्धही लढत होते. संत साहित्य म्हणजेच लोकसाहित्य. उच्चवर्णीय असूनही एकनाथांनी भारुडातून महिलांच्या समस्या मांडल्या.संत साहित्याने शिवरायांनाही प्रेरणा दिली. या साहित्यानेच मराठी भाषा जिवंत ठेवली. परब म्हणाले, संत साहित्याने समाजातील चुकीच्या प्रवृत्तींवर थेट प्रहार केले. असे धाडस आज कोणीही करणार नाही. हमीद दाभोलकर म्हणाले, अंनिसची वाटचालही संत परंपरेला अनुसरूनच व्हावी, अशी भूमिका डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मांडली होती. वारकरी परंपरेने देव नाकारणाऱ्यांनाही नाकारले नाही. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, प्रकाशक अरविंद पाटकर आदी उपस्थित होते. राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले.

वारीमार्गावर अन्नछत्रे कशासाठी?डॉ. भवाळकर म्हणाल्या, वारकरी परंपरा कोणावरही अवलंबून नाही. काहीही फुकट घ्यायचे नाही, अशी तिची मानसिकता आहे. तरीही, सध्या वारीमार्गावर अन्नछत्रे दिसतात. ती वारकरी परंपरेत बसत नाहीत. वारीमार्गावर मांसबंदी, व्यसनांचा प्रचार, अन्नछत्रे यांची उभारणी विशिष्ट हेतूने सुरू आहे. आजची वारकरी परंपरा भांडवलशाहीकडे जाऊ लागली आहे.