शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: पलूसमध्ये शिक्षण संस्था संचालकाचा धारदार शस्त्राने खून, आरोपी फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:21 IST

हत्येमागील नेमके कारण अस्पष्ट

पलूस : शहरातील पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक संजय प्रभाकर परांजपे (रा. कुंडलवेस पलूस, वय ६०) यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. हत्या करून आरोपी फरार झाला. या घटनेची माहिती पलूस पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेतली. या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय परांजपे हे कुंडल वेस येथील अपार्टमेंटमध्ये रहात होते. ते कुटुंबासमवेत घरी बसले होते. ते अचानक उठून बिल्डिंगच्या खाली मंदिरात गेले होते. काही वेळानंतर परांजपे घरी आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.बिल्डिंगच्या खाली येऊन पहाताच त्यांचा अडगळीच्या जागेत त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संजय परांजपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तात्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. आरोपीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर कानाजवळ व डोळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वर्मी घाव केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. पोलिस या घटनेचा रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मृतदेह पुढील तपासासाठी पाठविला असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संजय परांजपे हे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. उदय परांजपे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

कुटुंबाला सामाजिक, शैक्षणिक वारसापलूसमध्ये परांजपे कुटुंबाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील समृद्ध परंपरेचा वारसा आहे. आजोबा माधवराव परांजपे व वडील प्रभाकर परांजपे यांचा वारसा या कुटुंबाने आजवर पुढे नेला आहे. अशा कुटुंबातील व्यक्तीच्या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पलूस शहरात घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. पोलिस आरोपीला लवकरात लवकर पकडतील. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. रात्री उशिरा पंचनामा करून अज्ञातावर गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू करू. - सिद्धेश्वर जंगम, पोलिस निरीक्षक, पलूस.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Education Institute Director Murdered in Palus; Accused Absconding

Web Summary : Sanjay Paranjape, director of an education institute in Palus, Sangli, was murdered with a sharp weapon. The unidentified assailant is absconding. Police are investigating.