शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

सांगली : शिक्षणमंत्र्यांचे वक्तव्य शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारं, रावसाहेब पाटील यांचा संताप

By अशोक डोंबाळे | Updated: March 22, 2023 13:06 IST

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळा सरकार ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे, असे वक्तव्य विधान विधानसभेत केले आहे.

अशोक डोंबाळेसांगली : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळा सरकार ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे, असे वक्तव्य विधान विधानसभेत केले आहे. वास्तविक पाहता त्यांचे हे विधान म्हणजे विधानसभेतील सदस्यांशी दिशाभूल करणारी व राज्याची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारी आहे, अशी टीका सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

रावसाहेब पाटील म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात शासनाला जे जमणार नाही ते बहुजन समाज शिक्षणाचे पवित्र कार्य खासगी संस्थाचालकांनीच केले आहे. महाराष्ट्रातील ६७ टक्के शिक्षणाचे काम खासगी शिक्षण संस्था करत आहेत. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले व क्रांतिमाता सावित्रीमाई, संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे, महर्षी कर्वे यांनी खासगी शाळा सुरू केल्या. म्हणूनच आज ग्रामीण भागातील मुले उच्च पदावर पोहोचले आहेत. शिक्षणमंत्री केसरकर यांचे वक्तव्य थोर समाजसुधारकांसह राज्यातील सुमारे आठ हजार शिक्षण संस्था यांचा अवमान करणारे आहे. केवळ वेतनेतर अनुदान द्यायची तरतूद नाही, म्हणून संस्थेच्या शाळाच ताब्यात घेणार ही हुकूमशाही वृत्ती पुरोगामी महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था धोक्यात आणणारी आहे. माध्यमिक शाळा या खासगी शिक्षण संस्थांच्या आहेत म्हणून केंद्र शासनाचा समग्र शिक्षण अभियानाचा निधी देता येत नाही, असे केसरकर यांचे विधानही विद्यार्थी हिताचे नाही. वेतनेतर अनुदानाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असताना असे बेजबाबदार वादग्रस्त विधान करून केसरकर यांनी खासगी शिक्षण संस्थांचा अपमान केला आहे. केसरकर यांच्या या बेजबाबदार विधानाबद्दल त्यांचा शिक्षण संस्थांकडून जाहीर निषेध केला आहे.शिक्षणमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलनअडचणीत असलेल्या शिक्षण संस्थांच्या शाळांना मदत करण्याऐवजी शाळाच ताब्यात घेणार ही बेजबाबदार घोषणा बहुजन समाजाचे शिक्षण संपवणारी आहे. या त्यांच्या विधानामुळे राज्यभर असंतोषाची लाट उसळली आहे. राज्यातील संस्थाचालक व बहुजन समाज त्यांना जाब विचारण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरेल. शिक्षणमंत्री केसरकर यांनी केलेले विधान मागे घ्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रावसाहेब पाटील यांनी दिला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर