होतकरू मुलींच्या शिक्षणास गती मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:29 IST2021-02-16T04:29:05+5:302021-02-16T04:29:05+5:30
इस्लामपूर : येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्ट व जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्यावतीने वाळवा तालुक्यातील गोर-गरीब कुटुंबातील विद्यर्थिनींना ...

होतकरू मुलींच्या शिक्षणास गती मिळेल
इस्लामपूर : येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्ट व जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्यावतीने वाळवा तालुक्यातील गोर-गरीब कुटुंबातील विद्यर्थिनींना ज्या सायकली दिल्या आहेत. त्यातून या मुलींच्या शालेय जीवनास निश्चितपणे गती मिळेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राजारामनगर येथे वाळवा तालुक्यातील १०० गोर-गरीब शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम झाला.
पाटील यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून लाभार्थी विद्यर्थिनींना स्वतः माईक देत या उपक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यास सांगितले.
यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, डॉ. एन. टी. घट्टे, डॉ. मनीष घट्टे, इलियास पिरजादे, प्राचार्य आर. डी. सावंत, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, खंडेराव जाधव, प्रकाश जाधव उपस्थित होते.
फोटो-१५इस्लामपूर६
फोटो ओळी- राजारामनगर येथे १०० शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप प्रसंगी जयंत पाटील, प्रा.शामराव पाटील,डॉ.एन.टी.घट्टे, डॉ.मनीष घट्टे,आर.डी.सावंत,संजय पाटील,बाळासाहेब पाटील,खंडेराव जाधव,प्रकाश जाधव, इलियास पिरजादे उपस्थित होते.