शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत घेतला मोठा निर्णय, स्लीपरऐवजी आता..; सामान्य प्रवाशांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 12:19 IST

स्लीपरच्या आरक्षित तिकिटासाठी प्रिमियम दर मोजावा लागणार

सदानंद औंधेमिरज : रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात स्लीपर बोगींची संख्या कमी करून तृतीय श्रेणी इकाॅनाॅमी वातानुकूलित बोगी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्लीपर श्रेणीची संख्या कमी हाेऊन नाइलाजाने वातानुकूलित इकाॅनाॅमी बोगीतून प्रवास करावा लागणार असल्याने सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. मिरजेतून दिल्लीला जाणारी गोवा एक्स्प्रेस जूनपासून संपूर्ण वातानुकूलित होणार असून या गाडीला केवळ दोनच स्लीपर बोगी असणार आहेत.रेल्वेने दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी तृतीयश्रेणी इकॉनॉमी व तृतीयश्रेणी वातानुकूलित श्रेणीचे एकत्रीकरण करून भाडेरचनेचेही एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय मागे घेऊन आता तृतीयश्रेणी इकॉनॉमीचे बुकिंग सर्व रेल्वेगाड्यात पुन्हा सुरू करण्यात आले आहे. २२ मार्चपासून या निर्णयाची देशभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे.रेल्वेने सप्टेंबर २०२१ मध्ये वातानुकूलित बोगीपेक्षा आठ टक्के स्वस्त तृतीयश्रेणी इकॉनॉमी वातानुकूलित बोगी सुरू केली. १४ महिन्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये ते बंद करून त्याचे भाडे तृतीयश्रेणी वातानुकूलित बोगीप्रमाणे केले. रेल्वे बोर्डाच्या व्यवस्थापकांनी मंगळवार, २१ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता पुन्हा प्रवाशांना इकॉनॉमी वातानुकूलित बोगी आठ टक्के कमी भाड्यात उपलब्ध करण्यात आली आहे.

मिरजेतून येणाऱ्या जाणाऱ्या एक्स्प्रेसपैकी गोवा-दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये १६ जूनपासून नऊ तृतीयश्रेणी इकॉनॉमी वातानुकूलित बोगी जोडण्यात येणार आहेत. यासाठी दहा स्लीपर बोगीपैकी दोनच ठेवण्यात येणार आहेत. यामुळे स्लीपरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अडीचपटीने जास्त असलेल्या वातानुकूलित बोगीचे भाडे देऊन प्रवास करावा लागणार आहे. मात्र तृतीयश्रेणी इकॉनॉमीचे भाडे वातानुकूलित बोगीपेक्षा स्वस्त असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा रेल्वेचा दावा आहे.

केवळ आठ टक्के कमी भाडेतृतीयश्रेणी इकॉनॉमी वातानुकूलित बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला तृतीयश्रेणी वातानुकूलित बोगीप्रमाणे बेडरोल मिळत नाही. बेडरोलची आवश्यकता असेल तर जादा पैसे मोजावे लागतात. याचे नाव ‘इकाॅनाॅमी’ असे असले तरी केवळ आठ टक्के कमी भाडे आहे.

स्लीपरच्या आरक्षित तिकिटासाठी प्रिमियममिरजेतून येणाऱ्या जाणाऱ्या बेंगलोर-अजमेर, जोधपूर-गांधीधाम, बेंगलोर-दिल्ली संपर्कक्रांती, यशवंतपूर-चंदीगड या गर्दी असलेल्या एक्स्प्रेसमध्येही टप्प्याटप्प्याने स्लीपर बोगी कमी करून इकाॅनाॅमी वातानुकूलित बोगी जोडण्यात येणार असल्याने रेल्वे प्रवास महागणार आहे. स्लीपर बोगी कमी झाल्याने स्लीपरच्या आरक्षित तिकिटासाठी प्रिमियम दर मोजावा लागणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे