मिरजेत गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक कागदी मखरे बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:12+5:302021-09-02T04:55:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेत गणेशोत्सवासाठी आकर्षक व पर्यावरणपूरक मखरे विक्रीसाठी आली आहेत. प्लास्टिक व थर्माकोलऐवजी कागदी पुठ्ठ्यापासून ...

मिरजेत गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक कागदी मखरे बाजारात
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत गणेशोत्सवासाठी आकर्षक व पर्यावरणपूरक मखरे विक्रीसाठी आली आहेत. प्लास्टिक व थर्माकोलऐवजी कागदी पुठ्ठ्यापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक आकर्षक मखराच्या सार्थक गणेश डेकोरेशन या विक्री केंद्राचे उद्घाटन महापाैर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सर्रास प्लास्टिक व थर्माकोलच्या मखरांची सजावट करण्यात येते. मात्र आता प्लास्टिक व थर्माकोलऐवजी कागदी पुठ्ठ्यापासून बनविलेले गड किल्ले, थ्रीडी वनराई मखर, कोकण मखर, सुवर्ण मखर, फोलरसन मकर, २४ कॅरेट गोल्ड मखर, सूर्य मखर, सिद्धिविनायक मखर, थ्रीडी गणेश महल, डायमंड मखर, नवरंग मखर, मथुरासन मकर, जयपूर जाळी सेट, कोपर मंदिर यासारखे विविध प्रकार व १८ ते ५७ इंच आकारातील मखरे यावर्षी बाजारात उपलब्ध आहेत.
चारशे रुपयांपासून ५ हजारापर्यंत या कागदी मखराच्या किमती असल्याचे विक्रेते प्रीतेन आसर यांनी सांगितले. मखर विक्री केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक करण जामदार, मोहन व्हनखंडे, गजेंद्र कुळळोळी, रमेश आसर, रक्षा आसर, ज्योती कांबळे, तानाजी बिदनूर उपस्थित होते.