पोलीस मुख्यालयाचे पूर्व प्रवेशव्दार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:25 IST2021-03-25T04:25:38+5:302021-03-25T04:25:38+5:30

सांगली : विश्रामबाग येथे असलेल्या पोलीस मुख्यालयात येण्यासाठी पूर्व दिशेकडून असलेले प्रवेशव्दार आजपासून बंद करण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या ...

East entrance of police headquarters closed | पोलीस मुख्यालयाचे पूर्व प्रवेशव्दार बंद

पोलीस मुख्यालयाचे पूर्व प्रवेशव्दार बंद

सांगली : विश्रामबाग येथे असलेल्या पोलीस मुख्यालयात येण्यासाठी पूर्व दिशेकडून असलेले प्रवेशव्दार आजपासून बंद करण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या हॉकी मैदानावर नवीन अधीक्षक कार्यालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे सांगली-मिरज मार्गावरील मुख्य प्रवेशव्दारातूनच आता प्रवेश मिळणार आहे.

पोलीस मुख्यालयासह विश्रामबाग पोलीस ठाण्यात येण्यासाठी पूर्व बाजूला प्रवेशव्दार होते. अधिकाऱ्यांसह सर्वच याच मार्गाने अधीक्षक कार्यालयात प्रवेश करत होते. मात्र, या प्रवेशव्दाराजवळच असलेल्या हॉकी व बास्केटबॉल मैदानावर आता नवीन अधीक्षक कार्यालय होणार आहे. याठिकाणी लवकरच बांधकाम सुरू होणार असल्याने या परिसराची स्वच्छता सुरू असून, सध्या बांधकामाच्या पायासाठी यंत्राव्दारे तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला असून, पोलीस मुख्यालयास दक्षिण बाजूस असलेल्या तीन मार्गांपैकी दोन मार्ग खुले करण्यात आले आहेत.

Web Title: East entrance of police headquarters closed