वारणावती : चांदोली परिसरात सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ३.० रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का वारणावती परिसरात जाणवला असून या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून ८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही, असे धरण प्रशासनाने सांगितले आहे. हा धक्का सौम्य स्वरूपाचा असला तरी परिसरात तो जाणवल्यामुळे घबराटीचे वातावरण आहे.या धक्क्यामुळे मात्र, कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपाच्या या धक्क्याने चांदोली धरण व परिसरास कोणताच धोका नसल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Sangli: चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:31 IST