कडेगाव एमआयडीसीतील ११ उद्योगांचा होणार ई-लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST2021-02-07T04:25:16+5:302021-02-07T04:25:16+5:30
कडेगाव : कडेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी टेक्स्टाइल उद्योग सुरू केले होते. परंतु, या व्यवसायातील अडचणींमुळे बहुतांश ...

कडेगाव एमआयडीसीतील ११ उद्योगांचा होणार ई-लिलाव
कडेगाव : कडेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी टेक्स्टाइल उद्योग सुरू केले होते. परंतु, या व्यवसायातील अडचणींमुळे बहुतांश उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे येथील बहुतांश सर्व उद्योजक कर्जबाजारी झाले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या कडेगाव शाखेतून घेतलेल्या कर्जवसुलीसाठी यातील ११ उद्योजकांच्या
टेक्स्टाइल उद्योगासाठी वापरात असलेली
जागा, इमारत आणि मशिनरी अशा मालमत्तेचा ई-लिलाव होणार आहे.
बँक ऑफ इंडियाने १८ मार्च २०२१ रोजी येथील ११ उद्योगांच्या
मालमत्तेची ई-लिलाव प्रक्रिया होणार
असल्याच्या सूचना संबंधित कर्जदार व समस्त लोकांच्या माहितीसाठी दिल्या आहेत. उद्योजकांकडून कर्जाचे हप्ते बँकांना विहित वेळेत न गेल्याने बँकांनी येथील टेक्स्टाइल लिलाव सुरू केले आहेत. यामुळे उद्योजकांसमोर संकटांची मालिकाच सुरू आहे. उद्योजकांनी कर्ज घेताना बँकेकडे गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचा बँकेने तात्त्विक अथवा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. ही मालमत्ता ज्या अवस्थेत आहे तशी, जे काही आहे त्याचा व जेथे आहे तशी या तत्त्वाने ई-लिलाव होणार आहे.
वास्तविक, राज्यातील टेक्स्टाइल उद्योगाला मिळणाऱ्या सवलतीच बंद झाल्या आहेत. यामुळे कडेगाव येथील व्हिव्हर्स पार्कमधील उद्योगांनाही घरघर लागली आहे. येथील अनेक उद्योग मरणासन्न अवस्थेत आहेत. या उद्योगांना पुनर्जीवित करण्यासाठी
सवलतीच्या दरात वीज देणे गरजेचे आहे. अभय योजना व ३५ टक्के अनुदान देण्याबाबतचा ठोस निर्णय
होणे गरजेचे आहे. या एमआयडीसीतील
१४० टेक्स्टाइल उद्योगांपैकी केवळ २० ते २५ उद्योग सुरू आहेत. बाकीचे सर्व उद्याेग बंद पडले आहेत. त्यामुळे येथील उद्योजक कर्जबाजारी झाले आहेत.
चौकट
लिलाव प्रक्रियेला स्थगिती मिळावी
शासनाने बँकेकडून होत असलेल्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती द्यावी. तसेच येथील आजारी उद्योग पुनर्जीवित करण्यासाठी राज्य शासनाकडून ठोस उपाययोजना व्हाव्या, वन टाइम सेटलमेंटचे योग्य पर्याय द्यावेत, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी लक्ष घालून वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्याशी चर्चा करावी व शासनस्तरावर ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उद्याेजकांनी व्यक्त केली.
फोटो : यंत्रमाग उद्योग मशीनचा वापरावा