सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची ना हरकत दाखल्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. आतापर्यंत ५५० हून अधिक जणांनी महापालिकेकडे ना हरकतसाठी अर्ज केले आहेत. त्यात उमेदवारासह सूचक व अनुमोदकही थकबाकीदार नसावा, असे बंधन असल्याने अनेकांनी सूचक, अनुमोदकांचीही थकबाकी भरली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत एक कोटीची भर पडली आहे. या निवडणुकीत सुमारे दोन कोटींची थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे.महापालिकेची निवडणूक लढविणारा उमेदवार हा त्या संस्थेचा थकबाकीदार नसावा, अशी अट राज्य निवडणूक आयोगाने घातली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व त्याला सूचक-अनुमोदक असणाऱ्यांना महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता करासह इतर सर्व कर पूर्ण भरणे आवश्यक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी थकबाकी भरण्यास सुरूवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून महापालिकेत थकबाकी भरून एनओसी घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली आहे. त्यासाठी उमेदवार आपली व सूचक-अनुमोदकाची थकबाकी भरून देणे नसल्याचा दाखला घेत आहेत.त्यामुळे गेल्या चार दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत सुमारे एक कोटी रुपये जमा झाले आहेत. घरपट्टी विभागाची सुमारे १ कोटीची थकबाकी वसूल झाली आहे, तर पाणीपट्टी विभागाचे ३ ते ४ लाख वसूल झाले आहे. अर्ज भरण्यासाठी मंगळवार २३ पासून सुरुवात झाली असून, दि. २७ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत आहे. या मुदतीत दोन कोटींची थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Sangli civic polls spur revenue boost. No-objection certificates for candidates, proposers, and seconders fuel recovery. Over ₹1 crore recovered in four days; ₹2 crore expected by deadline. Home and water tax drive revenue surge.
Web Summary : सांगली नगर निगम चुनावों से राजस्व में वृद्धि। उम्मीदवारों, प्रस्तावकों और समर्थकों के लिए अनापत्ति प्रमाण पत्र से वसूली को बढ़ावा। चार दिनों में ₹1 करोड़ से अधिक की वसूली; अंतिम तिथि तक ₹2 करोड़ अपेक्षित। गृह और जल कर से राजस्व में वृद्धि।