शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'ताकारी, टेंभू'मुळे ऐन दुष्काळात हिरवाई; नियोजनानुसार आवर्तनांमुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून समाधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 17:51 IST

प्रताप महाडिक  कडेगाव : चालू वर्षी खरीप हंगामात सांगली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.ताकारी आणि टेंभू या दोन्ही ...

प्रताप महाडिक कडेगाव : चालू वर्षी खरीप हंगामात सांगली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.ताकारी आणि टेंभू या दोन्ही सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील कडेगाव व खानापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. या दुष्काळी स्थितीत दोन्ही योजनांची  आवर्तने मात्र  नियोजित वेळेनुसार दिली जात आहेत. त्यामुळे ऐन दुष्काळात लाभक्षेत्रातील शेतीपिकांना दिलासा मिळत आहे.दुष्काळी म्हणून ओळख असलेला कडेगाव आणि खानापूर  तालुक्याचा काही भाग सधन  म्हणून ओळखला जात आहे. ताकारी आणि टेंभू योजनांचे पाणी आल्यापासून  येथील पाणीटंचाई कमी झाली आहे. सुरूवातीच्या काळात वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे दोन्ही योजनांच्या पहिल्या आवर्तनास थोडासा विलंब होत असे. आता मात्र ८१ /१९ फॉर्म्युला आल्यामुळे ८१ टक्के वीजबिल शासन भरते व उर्वरित १९ टक्के वीजबिल शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीतुन भरले जाते.पाणीपट्टी वसुलीसाठी सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील ऊस गळपासाठी उचलणारे साखर कारखाने पाटबंधारे विभागास सहकार्य करीत आहेत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे  सिंचन योजनांच्या  वीजबिल थकबाकीचा प्रश्न सहसा उद्भवत नाही. ताकारी योजनेचे आवर्तन नुकतेच बंद झाले आहे. मात्र ते विहित वेळेनुसार पुन्हा सुरू होईल. टेंभू योजनेचे आवर्तनही नुकतेच सुरू झाले आहे. जवळपास ५० हजार हेक्टर  शेतजमिनीला टेंभूचे  तर २२ हजार हेक्टर शेतजमिनीला ताकारी योजनेचे पाणी मिळते. टेंभु व ताकारी योजनेच्या मुख्य कालव्याच्या अस्तरिकरणाचे काम  पूर्ण झाले  आहे. यामुळे पाण्याचा अपव्ययही कमी झाला आहे. दोन्ही योजनांच्या  पोटकालव्यांची कामे अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण करून बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी शेतकऱ्यांच्या  बांधावर पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे .ही कामे पूर्ण होताच टेंभू योजनेचे ८० हजार  हेक्टर लाभक्षेत्राला ताकारी योजनेचे २७ हजार हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळेल.शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून देऊन ऍडव्हान्स पाणीपट्टी भरल्यास   पाणीपट्टीचे दरही कमी होतील. वसुली योग्यप्रकारे होईल.असे सिंचन योजनांच्या अभ्यासकांचे मत आहे. पारदर्शक पद्धतीने लाभक्षेत्र मोजणी पाणीपट्टी आकारणी केल्यास दोन्ही  योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत. एकंदरीत दोन्ही योजनांच्या माध्यमातून ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना  मोठा दिलासा मिळाला आहे.दोन्ही योजनांची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत आणि लाभक्षेत्रामध्ये वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

अपुरा कर्मचारी वर्गताकारी आणि टेंभू दोन्ही योजनांचा स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू झाला आहे. लाभक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी, पाणीपट्टी वसुली, आवर्तनांचे नियोजन ही कामे या विभागाकडे सोपविली आहेत. परंतु या विभागाकडे दोन्ही योजनांसाठी अपुरा कर्मचारी वर्ग आहे. यामुळे ही कामे केवळ ३० ते ४० टक्के कर्मचारी पूर्ण करू शकत नाहीत. शासन नवीन कर्मचारी भरती करीत नाही आणि कंत्राटी पध्दतीनेही कर्मचारी भरती करीत नाही. यामुळे सिंचन व्यवस्थापन विभाग अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी