शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जत तालुक्यात साडेतीन लाख पशुधन संकटात

By हणमंत पाटील | Updated: May 24, 2024 13:10 IST

चारा व पाणीटंचाईचे दुहेरी टंचाई : जनावरांची कवडीमोल दराने विक्री

दरीबडची : अपुऱ्या पावसामुळे वाया गेलेला खरीप व रब्बी हंगाम, पाणी व चाराटंचाईच्या दुहेरी संकटाने तीव्र दुष्काळी परिस्थिती ओढावली. यामुळे जत तालुक्यात वैरणीची टंचाई निर्माण झाली आहे. तीन लाख ४९ हजार ८९५ जनावरे संकटात सापडली आहेत. आचारसंहितेमुळे चारा छावण्या सुरू नाहीत. त्यामुळे जनावरे सांभाळणे परवडत नसल्याने त्यांना बाजार दाखविण्याशिवाय पर्याय नाही. तर दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचे बाजार कमी होऊन कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकरी व पशुधन संकटात सापडले आहे.

दुष्काळी जत तालुक्यात शेती परवडत नसल्याने जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. खिलार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी तालुका प्रसिद्ध आहे. देखणी खिलार गाय आणि देखणा खोंड हे दुष्काळी माणदेशाचे वैभव आहे. जातिवंत देखणी, चपळ, चिवट आणि रोगप्रतिकारक असणारी खिलार जनावरे प्रसिद्ध आहेत. तालुक्यात गाई-बैल ७० हजार ९१६, म्हैशी ७० हजार ५८, शेळ्या ४५ हजार ९६४, मेंढ्या १ लाख ६२ हजार ८७७, असे एकूण ३ लाख ४९ हजार ८९५ पशुधन आहे. ४२ अंश सेल्सिअस एवढे उच्चांकी तापमान आहे. दुभत्या म्हशी-गाई जनावरांना जीवघेणा ठरू लागला आहे. खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. त्यामुळे चारा संपला आहे. चाऱ्याअभावी शेतकऱ्यांना जनावरे जगविणे कठीण झाले आहे.

१९७२ पेक्षा गंभीर परिस्थिती..यावर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा व पिण्याचे पाणी कोठून द्यायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. दुभती जनावरे संकटात सापडली आहेत. वैरण विकतच आणून घालावी लागत आहे. वैरणी दरात वाढ झाली आहे. तालुक्यात २०१३ मध्ये २८ चारा छावणी सुरू होत्या. छावणीत ४० हजार २०० जनावरे होती. सध्या चाराटंचाईने जनावरे अशक्त झाली आहेत. शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कवडीमोलाने जनावरांची विक्री..                    चाऱ्याअभावी भूकबळी होऊ नये. म्हणून शेतकरी जत, माडग्याळ, सांगोला, विजापूर येथील बाजारात जनावरांची विक्री करू लागले आहेत. बाजारात जनावरांना कवडीमोल किंमत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने संकटात सापडला आहे.

                      जनावरे संकटात सापडली आहेत. शेतकऱ्यांना जनावरे जगविणे अवघड झाले आहे. खुरट्या गवताअभावी शेळ्या-मेंढ्या या लहान जनावरांना चारा नाही. याकडे लक्ष देऊन चारा डेपो व चारा छावण्या सुरू कराव्यात. -रघू नागणे, शेतकरी, दरीकोणूर

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटdroughtदुष्काळWaterपाणी