शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातही पावसामुळे शेतीचे नुकसान, जनजीवन विस्कळीत, द्राक्ष बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 14:10 IST

सांगली जिल्ह्यातही  कुंडल येथे काल रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते . दुपारी 3 नंतर क्रांती कारखाना परीसर , बलवडी फाटा या भागात मध्यम पाऊस झाला .

ठळक मुद्देपलूस द्राक्षे बागेत पावसाचे पाणी साठून राहीले

 

सांगली--  सांगली जिल्ह्यातही  कुंडल येथे काल रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते . दुपारी 3 नंतर क्रांती कारखाना परीसर , बलवडी फाटा या भागात मध्यम पाऊस झाला . त्यानंतर मध्यरात्री दहा मि. पाऊस पडला . मात्र पहाटे 6.30 नंतर मुसळधार पाऊसास सुरुवात झाली असून विजेच्या गडगडाटासह मोठा पाऊस सुरु असून वातावरण अत्यंत कोंदट झाले असून या पावसाने ऊसाच्या तोडी ठप्प झाल्या असून  परीसरातील द्राक्षबागायतदार या अवकाळी पावसाने पुरता हबकला आहे .

काही द्राक्षबागा पोंगा अवस्थेत तर काही फ्लाऊरींग स्टेजमध्ये आहेत. या पावसाने द्राक्षासह  टो, झेंडू या सह इतर पिकांचे नुकसान होणार असून  आधीच शेतीमालाच्या दराच्या सुलतानी संकटात सापडलेला  शेतकर्यावय हे अस्मानी संकट ओढवले आहे . मात्र गहु, हरभरा  या पिकांना हा पाऊस उपयुक्त आहे .

कडेगाव व परीसरात पहाटे पाच वाजले पासून पाऊस सुरू दहा कारखान्याचे ऊस तोडी बंद राहणार.अवकाळी पडणाऱ्या पावसांनी द्राक्ष बागायतदार ही हवालदिल झाले आहेत.

बोरगाव ताकारी नवेखेड जुनेखेड मसुचीवाडी व परीसरात सलग पाच तास संत्तधार पाऊस सुरू अवेळच्या झालेल्या पावसाने  सोयाबीन भात तुर भूईमुग काढणी केलेल्या शेतऱ्यांचे व उभ्या पिकांचे ही नुकसान.

वाळवा  सुर्यगाव , नागठाणे परिसरात आज सकाळपासून पाऊस झाल्याने ऊस तोडी बंद पडल्या आहेत. वाळवा व परिसरातील गावात ही पाऊस पडला आहे. सूर्योदयापुर्वी पासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. कोंदट वातावरण व गारवा याने लोकांना उत्साह हरवले प्रमाणे झाले आहे. द्राक्षे बागायतदार यांची भिती वाढली आहे. अनेक बागा फलाॅवरिंगला आहेत , काही पोंगयात तर काही पक्व होऊन विक्रीला आल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी शिवारात पाणी साठले आहे. त्यामुळे ऊस तोडी बंद पडले आहेत.

भिलवडी परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण,तासभर जोरदार पाऊस पडला.शिवारात चिखल झाल्याने ऊसतोडणी पूर्णपणे बंद. पेठ येथे पाऊस सुरू झाला आहे

विटा शहरासह खानापूर परिसरात रात्री ११ पासून जोरदार अवकाळी पाऊस..विजांच्या कडकडाटासह पाऊस..निर्यातक्षम द्राक्षबागायतदार शेतकरी हवालदील ..

किर्लोस्करवाडी , रामानंदनगर  व परिसरात 6:45 पासून जोरदार पाऊस सुरू........जनजीवन विस्कळीत

पलूस द्राक्षे बागेत पावसाचे पाणी साठून राहीले

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली