‘कुसाईमाता’मुळे शेती बारमाही पिकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:59+5:302021-02-06T04:48:59+5:30
शिराळा : कुसाईमाता पाणी योजनेपासून वंचित जमिनीला पाणी मिळून शेती बारमाही पिकेल व त्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांचे राहणीमान, ...

‘कुसाईमाता’मुळे शेती बारमाही पिकेल
शिराळा : कुसाईमाता पाणी योजनेपासून वंचित जमिनीला पाणी मिळून शेती बारमाही पिकेल व त्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांचे राहणीमान, आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
कुसाईवाडी (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक कारखान्यामार्फत होणाऱ्या कुसाईमाता पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, शेतीसाठी पाणी आणि बेरोजगारांच्या हाताला काम हा मूलमंत्र घेऊन मी सार्वजनिक विकासात पुढे आहे. विश्वास व विराज उद्योग समूहांच्या माध्यमातून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मतदार संघातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवणार आहे.
उपसरपंच भास्कर पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर अविनाश पवार यांनी प्रास्ताविक केले. विराज नाईक, पी. आर. पोतदार, बाबासाहेब परिट, भीमराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश धस, सदस्य सम्राटसिंग नाईक, विराज नाईक, विष्णू पाटील, राम पाटील, पी. आर. पोतदार, सरपंच विनोद पन्हाळकर, देवेंद्र धस आदी उपस्थित होते. धोंडीराम पवार यांनी आभार मानले.
फोटो-०५शिराळा१
फोटो ओळी : कुसाईवाडी (ता. शिराळा) येथे कुसाईमाता पाणी योजनेच्या कामाचा कुदळ मारून आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रारंभ केला.