शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अयोग्य वातावरणामुळे बेदाणा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:38 IST

पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर  टाकावी लागली.

ठळक मुद्दे कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही.जालिहाळ खुर्द परिसरात बेदाणा उत्पादक आहेत

गजानन पाटील  । संख : पाणी टंचाई, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, खते व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत पूर्व भागातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. पाणी टंचाईमुळे द्राक्षे लवकर शेडवर  टाकावी लागली. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे काही भागातील द्राक्षातील साखर कमी झाल्यामुळे बेदाण्याचा प्रतिएकरी उताराही कमी झाला आहे. 

पाणी टंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षबागांची संख्या अधिक आहे. यावर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. वर्षभरात ४८.३ मिलिमीटर पाऊस झालो. शेततलाव, कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठ्यावर बागा जगविल्या आहेत. डिसेंबर महिन्यापासून बागांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. काही बागांना खोड जगविण्यासाठीही पाणी मिळाले नाही. उमदी परिसरामध्ये शेतकºयांनी टँकरने पाणीपुरवठा करून बागा आणल्या आहेत. 

अनुकूल हवामानामुळे यावर्षी द्राक्षवेलींना चांगले घड सुटले होते. दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. पण पाण्याच्या कमतरतेमुळे कांड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खरड छाटण्या उशिरा झाल्या होत्या. पाऊस कमी झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपासून बागेला पाणी कमी पडले. खताची मात्रा दिल्यावर पाणी जास्त लागते. पाणी कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यासाठी, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड व मणी लहान तयार झाले. द्राक्षात साखर पाहिजे त्याप्रमाणात तयार झाली नाही. बेदाण्यासाठी २६ ते २८ इतके साखरेचे प्रमाण असावे लागते.

मात्र यंदा ते कमी होते. त्यातच अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळेही द्राक्षांमध्ये साखर कमी तयार झाली. परिणामी बेदाणा चपटा झाला. साडेतीन ते चार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार झाला आहे. वातावरणातील बदलामुळे बेदाणा दर्जेदार तयार झाला नाही. वजनातही घट झाली. बेदाण्याचा उतारा एकरी दोन टनाऐवजी एक ते दीड टन आला आहे.द्राक्षाला बाजारात म्हणावा    तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. पूर्व भागातील उमदी, सिध्दनाथ, संख, बेळोंडगी, सुसलाद, बालगाव, हळ्ळी, मुचंडी, जालिहाळ खुर्द परिसरात बेदाणा उत्पादक आहेत. अनुकूल हवामान, खडकाळ जमीन यामुळे शेतकºयांनी स्वत:ची बेदाणा शेड उभी केली आहेत. सध्या बाजारात १५० ते १९० रुपये भाव मिळत आहे. परंतु  कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही.

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय