शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 19:51 IST

जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देजतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड शेतीला पाणी मिळणे जवळपास दुरापास्तच

संख : जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपलेल्या बागांवर आता कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.अनुकूल हवामानात कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे पीक म्हणून डाळिंब प्रसिद्ध आहे. डाळिंबामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग मिळाला होता. तालुक्यात ११ हजार ३४४.५९ हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी शेततळी, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. तालुक्यात यावर्षी केवळ ४०.३ मी. मी. इतकाच पाऊस झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यातच विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.अनेक भागात सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना विकतचे पाणी परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. पाणी नसल्यामुळे बागेतील झाडे अक्षरश: वाळून गेली आहेत.

शेतात फक्त वाळलेल्या झाडांचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्या थोड्या पाण्यावर बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी कमी पडल्याने झाडांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यामध्ये २०१२ ला दुष्काळ पडला होता. तत्कालीन राज्य सरकारने डाळिंब बागा जगविण्यासाठी एकरी १० हजार रुपये पाण्यासाठी दिले होते. सध्या बागा जगविण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे.

टॅग्स :droughtदुष्काळSangliसांगली