शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत -: उपसाबंदीने अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:22 IST

जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दरवर्षी मेमध्ये उन्हाळी पाऊस होत असल्यामुळे मशागती करून दि. १५ जूननंतर पेरणीस सुरुवात होते. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच झाल्या नाहीत.

ठळक मुद्दे ३.५ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेतपावसाचे वातावरण नसल्याने सोयाबीन टोकणीलाही सुरुवात झालेली नाही.

अशोक डोंबाळे ।सांगली : जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दरवर्षी मेमध्ये उन्हाळी पाऊस होत असल्यामुळे मशागती करून दि. १५ जूननंतर पेरणीस सुरुवात होते. पण, यावर्षी उन्हाळी पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच झाल्या नाहीत. जूनचा पहिला आठवडा संपत आला, तरीही पावसाची चिन्हे दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्याचा बहुतांशी भाग पावसावर अवलंबून आहे. परंतु यंदा मान्सून वेळेत दाखल होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकरी काहीसा चिंतेत आहे. पावसाला वेळेत सुरुवात झाल्यास पेरण्या शंभर टक्के होतील. पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. खरिपासाठी बराच कालावधी शिल्लक असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने हंगामाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठावर बारमाही पाण्याची सोय आहे. तेथे उसाचे क्षेत्र अधिक आहे. यावर्षी उसाच्या लागणी वाढल्या आहेत. याशिवाय टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनेतून बहुतांशी क्षेत्र पाण्याखाली आले आहे. त्यामुळे खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अनेक गावात ऊस, द्राक्ष आणि डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे.

कोयना व चांदोली धरणांमधील कमी झालेला पाणीसाठा, तापमानातील वाढ या पार्श्वभूमीवर पावसाला सुरुवात होईपर्यंत पाणी पुरविणे आवश्यक असल्याने पाटबंधारे विभागाने मंगळवारपासून जिल्ह्यात उपसाबंदी लागू केली आहे. कृष्णा नदीमधून औद्योगिक व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजनांसाठी उपसाबंदी आहे. ऊस, केळी आणि भाजीपाल्यासाठी पाणी आवश्यक आहे, परंतु कृष्णा आणि वारणा नदीवर उपसाबंदी लागू करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष पावसाकडे आहे.

जत, आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व तालुक्यातील पेरणी पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी चिंतेत आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज पश्चिम या कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या ऊस पट्ट्यातील गावांमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नदीकाठावरील अनेक गावांत आगाप सोयाबीन केला जातो, परंतु पावसाचे वातावरण नसल्याने सोयाबीन टोकणीलाही सुरुवात झालेली नाही.खते, बियाणे : गोदामात पडूनशिराळा तालुक्याला पावसाचे आगर म्हटले जाते. तेथे भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु या परिसरातील शेतकऱ्यांचेही पावसाकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सव्वा लाख टन खत लागणार आहे. याशिवाय ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. हंगामासाठी कृषी सेवा केंद्राची खते आणि बियाणे उपलब्ध होत आहेत. परंतु पाऊस नसल्याने पेरण्या पूर्ण थांबल्या असल्याने गोदामातील बियाणे आणि खते पडून आहेत.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी