शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांना ‘डाऊनी मिलिड्यू’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:29 IST

दादा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कसलगरे : मिरज पूर्व भागातील द्राक्षबागायतदारांपुढे ढगाळ हवामानामुळे ‘डाऊनी मिलिड्यू’ (दावण्या) या रोगाचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे. किमान दोन ते तीन दिवस हवामान असेच ढगाळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने, द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.यावर्षी द्राक्ष फळछाटण्या सुरू होण्याच्या कालावधीमध्ये सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन्ही ...

दादा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कसलगरे : मिरज पूर्व भागातील द्राक्षबागायतदारांपुढे ढगाळ हवामानामुळे ‘डाऊनी मिलिड्यू’ (दावण्या) या रोगाचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे. किमान दोन ते तीन दिवस हवामान असेच ढगाळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने, द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.यावर्षी द्राक्ष फळछाटण्या सुरू होण्याच्या कालावधीमध्ये सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन्ही महिन्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे बहुतांश बागा पोंगा अवस्थेत दावण्याच्या तडाख्यात सापडल्या आहेत. आॅगस्ट छाटणीच्या बागांमध्येही फुलोºयात मोठ्या प्रमाणात गळ होऊन बागांना फटका बसला होता. या सर्व संकटांतून ज्या द्राक्षबागा वाचल्या, त्या आता पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. राज्यात १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या काळात हवामान ढगाळ राहणार आहे. पश्चिम महाराष्टÑासह सांगली जिल्ह्यात दोन दिवसात पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.जिल्ह्यात शनिवारपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे अगोदरच डाऊनी मिलिड्यूचा प्रादुर्भाव असणाºया द्राक्षबागांमध्ये हा रोग थैमान घालू लागला आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४५ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढल्याने दमट हवामानामध्ये डाऊनीचे बीजाणू मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत. त्यामुळे द्राक्षबागायतदारांना या रोगाच्या नियंत्रणासाठी महागड्या बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे.औषध फवारणी...फुलोºयातील बागांवर या ढगाळ हवामानामुळे अळीचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वच अवस्थेतील बागांना खराब हवामानाने घेरल्याचे चित्र आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक पुन्हा दिवस-रात्र औषध फवारणीत व्यस्त दिसत आहेत.पावसाचा शिडकावामिरज पूर्व भागातील सीमावर्ती सलगरे व चाबुकस्वारवाडी परिसरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान तर होतेच, पण भर दुपारी बारा वाजता या भागात काही मिनिटे पावसाचा शिडकावा झाला. पण सुदैवाने मोठा पाऊस झाला नाही.बुरशीजन्य औषधांचा खर्च दुपटीने वाढलायावर्षी महिनाभर रेंगाळलेला परतीचा मान्सून व नंतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेत वाढलेली आर्द्रता व ढगाळ हवामान यामुळे बुरशीजन्य औषधांच्या फवारणीत वाढ करावी लागल्याने, एकरी द्राक्ष उत्पादनामधील औषधांचा खर्च वाढत आहे. याशिवाय द्राक्षांच्या दर्जावरही त्याचा परिणाम होत आहे. आॅगस्ट छाटणीच्या पक्व झालेल्या द्राक्षबागांनाही या अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे धोका निर्माण झाला आहे.ं

टॅग्स :agricultureशेती