केंद्रामुळेच साखर उद्योग अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2015 00:31 IST2015-05-22T23:13:17+5:302015-05-23T00:31:44+5:30
जयंत पाटील : राजारामबापू कारखाना निवडणूक प्रचारास प्रारंभ

केंद्रामुळेच साखर उद्योग अडचणीत
नेर्ले : केंद्र शासन साखरेचा दर ३१00 पर्यंत ठेवण्यात अपयशी ठरल्याने साखर उद्योग अडचणीत आला आहे. राजारामबापू कारखाना निवडणुकीत कोणी चार अर्ज ठेवले म्हणून नाराज होऊ नका़ सभासदांच्या घरा-घरापर्यंत पोहोचा़ आपल्या पारदर्शी कारभारास सभासदांनी नेहमीच आशीर्वाद दिला आहे़ याही निवडणुकीत देतील, असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी काळमवाडी (ता. वाळवा) येथे व्यक्त केला.
काळम्मादेवीच्या साक्षीने राजारामबापू साखर कारखान्याच्या निवडणुकीतील राजारामबापू सहकार पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ आ़ पाटील यांच्याहस्ते करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते़ जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, प्रा. शामराव पाटील, विष्णुपंत शिंदे, बी़ के. पाटील, नेताजीराव पाटील, देवराज पाटील, जि़ प़ उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले की, कारखान्याचे संचालक मंडळ २६ वरून २१ झाल्याने अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही, याची खंत आहे़ दोन तज्ज्ञ संचालक व तीन निवड समितीच्या सदस्यपदी काही जणांना संधी देता येईल़ पी़ आऱ पाटील, प्रचारप्रमुख प्रा़ शामराव पाटील, बी़ के. पाटील यांनी, काही विघ्नसंतोषी मंडळींनी चार उमेदवार उभे करून सभासदांवर निवडणूक लादल्याचा आरोप केला.
वसंत सावंत यांनी प्रास्ताविक, तर लक्ष्मण सावंत यांनी सूत्रसंचालन केले़ ए. टी़ पाटील यांनी आभार मानले. जनार्दन पाटील, विनायक पाटील, विजयबापू पाटील, दिलीप वग्याणी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, संग्राम फडतरे, सुहास पाटील, आप्पासाहेब कदम, आनंदराव पाटील, सुरेश गावडे उपस्थित होते. (वार्ताहर)
मी फसवणूक केली?
विलासराव शिंदे, दिलीपराव पाटील हेच बँक निवडणुकीबाबत मोहनराव कदम यांच्याशी बोलत होते़ मी एकदाही त्यांच्याशी बोललो नाही़ मग मी त्यांना कोणता शब्द दिला आणि तो न पाळून त्यांची कशी फसवणूक केली, हे मला कळत नाही, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.