शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुधोंडीतील कबड्डी लीग अखेर रद्द; बुधवारी भोगावतीमध्ये आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 13:12 IST

Kabaddi, Sangli , Kolhapurnews दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित केलेली कबड्डी लीग अखेर रद्द करण्यात आली. कबड्डी असोसिएशनची परवानगी न घेता आयोजन केले जात असल्याबद्दल जिल्हा शाखेने पोलिसांत धाव घेतली होती.

ठळक मुद्देदुधोंडीतील कबड्डी लीग अखेर रद्द; बुधवारी भोगावतीमध्ये आयोजन कबड्डी असोसिएशनची पोलिसांत धाव

सांगली : दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित केलेली कबड्डी लीग अखेर रद्द करण्यात आली. कबड्डी असोसिएशनची परवानगी न घेता आयोजन केले जात असल्याबद्दल जिल्हा शाखेने पोलिसांत धाव घेतली होती.सचिव नितीन शिंदे, राज्य उपाध्यक्ष दिनकर पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ घोडके यांनी तक्रारीत म्हटले होते की, बोगस कबड्डी लीगद्वारे खेळाडूंकडून पैसे गोळा करण्याचा उद्योग सुरु आहे.

धुळ्यातील एका संस्थेने तिचे आयोजन केले होते, मात्र त्यासाठी असोसिएशनची मान्यता घेतली नव्हती. फसवणुकीची माहिती नसलेल्या काही खेळाडूंनी प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे पैसे जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, धुळ्याच्या संघटनेने या चाचणी स्पर्धा आता भोगावती (जि. कोल्हापूर ) येथे बुधवारी (दि. ९) घेण्याचे नियोजन केले आहे. सांगली व कोल्हापुरातील खेळाडूंची एकत्रित चाचणी केली जाणार आहे. मात्र कोल्हापुरातील कबड्डी असोसिएशननेही त्या रोखण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Kabaddiकबड्डीSangliसांगलीkolhapurकोल्हापूर