दुधोंडी ग्रामपंचायतीस ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:46+5:302021-02-17T04:32:46+5:30

आरबुने म्हणाले, सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, खासदार संजयकाका ...

Dudhondi Gram Panchayat ‘Smart Village’ Award | दुधोंडी ग्रामपंचायतीस ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार

दुधोंडी ग्रामपंचायतीस ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार

आरबुने म्हणाले, सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, खासदार संजयकाका पाटील, आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ग्रामपंचायतीने स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण व पारदर्शक व तंत्रज्ञानाच्या निकषावर तालुका स्तरावर उत्कृष्ट कामकाज केले. स्मार्ट ग्राम ही पुरस्काराची पहिली पायरी आहे. यानंतर जिल्हा, राज्य व देशपातळीवर गावचा लौकिक वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. गाव आदर्श करण्याचा प्रयत्न आहे.

फोटो : १६ दुधाेंडी १

ओळ : दुधोंडी (ता. पलूस) ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामपुरस्कार सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. सरपंच विजय आरबुने, उपसरपंच रवींद्र नलवडे, ग्रामसेवक मिलिंद आपटे, जगदीश तिरमारे यांनी पुरस्कार स्वीकारला.

Web Title: Dudhondi Gram Panchayat ‘Smart Village’ Award