एवढ्या मोठ्या गावाचा कारभार प्रभारी ग्रामसेवक पाहात असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रभारी ग्रामसेवकांकडे दोन गावांचा पदभार असल्याने त्यांनादेखील काम करण्यात अडचण निर्माण होत आहे. हे रडगाणे गाव चावडीतही सुरू आहे. दुधगावला तलाठीदेखील प्रभारीच असल्याने शेतीचे उतारे मिळण्यास उशीर होत आहे. तलाठ्यांकडेही दोन गावांचा कारभार असल्याने दोन्ही गावात काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे दोन्ही कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
चौकाट
...तर टाळे ठोकणार
गावच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला असल्याने सामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अधिकाऱ्यांच्या सहीसाठी दोन गावांना हेलपाटे घालावे लागत आहेत. एक जुलैपासून पूर्णवेळ अधिकारी न दिल्यास दोन्ही कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.