कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी तयार असल्याचा दुदनकर रुग्णालयाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:12+5:302021-07-07T04:34:12+5:30

सांगलीत १६ मार्च ते २१ जूनदरम्यान दुदनकर रुग्णालयात २७६ कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. या पैकी ७० ...

Dudankar Hospital claims that it is ready to investigate the death of Kovid patients | कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी तयार असल्याचा दुदनकर रुग्णालयाचा दावा

कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी तयार असल्याचा दुदनकर रुग्णालयाचा दावा

सांगलीत १६ मार्च ते २१ जूनदरम्यान दुदनकर रुग्णालयात २७६ कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. या पैकी ७० पॉझिटिव्ह रुग्ण दगावले असून रुग्णालयात कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सुमारे २२ ते २५ टक्के असल्याचे डॉ. महेश दुदनकर यांनी सांगितले. रुग्णालयाबाबत गैरसमज पसरविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या काही मंडळींचा बदनामीचा हेतू सफल होणार नाही. रुग्णालय कोणत्याही चौकशीसाठी तयार असून प्रशासनाने तपासणी व चौकशी केव्हाही करावी, असेही डॉ. दुदनकर यांनी सांगितले. महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांकडून कोविडच्या काळात सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधांची दररोज तपासणी झाली होती. महापालिका, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांकडून रुग्णालयाच्या वेळोवेळी तपासणीत कोणताही दोष संबंधितांना आढळलेला नाही. मात्र याबाबत काही शंका असल्यास यापुढेही प्रशासनाच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे डॉ. महेश दुदनकर यांनी सांगितले.

Web Title: Dudankar Hospital claims that it is ready to investigate the death of Kovid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.