वाळवा - शिराळा दूध संघाचे मागेल त्यांना शेअर्स देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:40+5:302021-02-05T07:20:40+5:30
इस्लामपूर : तालुक्यातील साखर कारखाने तोंड पाहून उसाला तोड देत आहेत. गरिबाच्या उसाला मात्र लवकर तोड मिळत नाही. कोणत्याही ...

वाळवा - शिराळा दूध संघाचे मागेल त्यांना शेअर्स देणार
इस्लामपूर : तालुक्यातील साखर कारखाने तोंड पाहून उसाला तोड देत आहेत. गरिबाच्या उसाला मात्र लवकर तोड मिळत नाही. कोणत्याही सामान्य माणसाला दूध संघ, कारखान्याचे शेअर्स दिले जात नाहीत. मात्र, वाळवा - शिराळा दूध संघ मागेल त्याला शेअर्स देणार आहे, अशी ग्वाही भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी दिली.
इस्लामपूर येथील प्रभाग १२ व १४ मध्ये आयोजित दूध संघाच्या शेअर्स वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्य समितीचे सदस्य सम्राट महाडिक, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, नगरसेवक अमित ओसवाल, विजय कुंभार, सतीश महाडिक, अन्नपूर्णा फल्ले, मनीषा रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहुल महाडिक म्हणाले, वाळवा - शिराळा दूध संघाची प्रत्येक गावात एक डेअरी उभारणार आहोत. दूध संघाचे सभासदत्व मागेल त्याला देणार आहे.
सम्राट महाडिक म्हणाले, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात दूध उत्पादकांची संख्या फार कमी आहे. ग्रामीण भागात सहकार रूजलेला आहे. शहरी भागातील नागरिक दूध संघाचे सभासद होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे वाळवा - शिराळा दूध संघाचे सभासद होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
यावेळी गजानन फल्ले, उषा मोरे, अनिता ओसवाल, शाकीर तांबोळी, राजेंद्र शिंदे, चंद्रशेखर तांदळे, राजवर्धन पाटील, आर. आर. पाटील, मंसूर मोमीन, विशाल शिंदे, अमोल कोरे, उत्तम कोळेकर, मानव गवंडी, नीलेश गवंडी उपस्थित होते. प्रास्ताविक सुजित थोरात यांनी केले. सुनील महाडिक यांनी आभार मानले.
फोटो - ३१०१२०२१-आयएसएलएम-वाळवा-शिराळा न्यूज
इस्लामपूर येथे आयोजित दूध संघाच्या शेअर्स वितरण कार्यक्रमावेळी राहुल महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सम्राट महाडिक उपस्थित होते.