वाळवा शिराळा को-ऑप. डेअरीच्या सभासद नोंदणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:52+5:302021-01-19T04:27:52+5:30
यावेळी सम्राट महाडिक म्हणाले, वाळवा व शिराळा तालुक्यातील सभासदांच्या फायद्यासाठी दूध संघ उभारण्यात येणार असून या डेअरीमार्फत सभासदांना दुधासाठी ...

वाळवा शिराळा को-ऑप. डेअरीच्या सभासद नोंदणीस प्रारंभ
यावेळी सम्राट महाडिक म्हणाले, वाळवा व शिराळा तालुक्यातील सभासदांच्या फायद्यासाठी दूध संघ उभारण्यात येणार असून या डेअरीमार्फत सभासदांना दुधासाठी जास्तीत जास्त परतावा देण्यात येईल. डेअरीच्या माध्यमातून रेठरे धरण येथे उद्योग येणे हे गावाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच हा दूध संघ गोकुळ दूध संघाशी जोडला जाणार आहे. या दूध संघामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
प्रमुख मान्यवरांच्याहस्ते इंद्रजित पाटील व विकास पाटील यांना या दूध डेअरीचे सभासद प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ माळी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय घोरपडे, डी. के. पाटील, नीलेश पाटील, तानाजी पवार, प्रशांत पाटील, इंद्रजित पाटील, विकास पाटील, सुदाम पाटील, अरविंद धुमाळ, हंबीरराव माळी, सतीश पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.