शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine-सांगलीत कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 17:10 IST

Corona vaccine Sangli- कोरोना लस मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना याबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी कोरोना ड्राय रन (रंगीत तालीम) घेण्यात आली. ही मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसांगलीत कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन यशस्वीमोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार

सांगली : कोरोना लस मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना याबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी कोरोना ड्राय रन (रंगीत तालीम) घेण्यात आली. ही मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यातील पहिल्या भागात शासकीय व खाजगी आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, अधिकारी,कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आज रंगीत तालीम घेतली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.मिरज तालुक्यात कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत, कवलापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शितोळे, डॉ. भूपाल शेळके, मिरज पंचायत उपसभापती  पाटील उपस्थित होते.

डुडी म्हणाले, दुसऱ्या भागामध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्यांना (पोलीस विभाग, महसूल विभाग, इतर शासकीय विभाग, बँक कर्मचारी, आशा वर्कर्स आदि) लसीकरण करण्यात येणार आहे. दोन डोस देण्यात येणार आहेत. पहिला डोसच्या 28 दिवसानंतर दुसरा देण्यात येणार आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोसची माहिती जिल्हा परिषदेमध्ये कॉल सेंटररून देण्यात येणार आहे.रंगीत तालीमीमध्ये तीन विभाग करण्यात आले. पहिल्या विभागामध्ये आरोग्य विभागातील 25 कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. दुसऱ्या विभागामध्ये आधार नोंदणीची सत्यता पडताळणी करून लस देण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तिसऱ्या विभागामध्ये रिकव्हरी रूमची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये लाभार्थ्याला अर्धा तास थांबवून घेऊन लसीकरणानंतर नियमितपणे कोरोना बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.

मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर पाळणे याबाबतचे महत्व सांगण्यात आले. लसीकरणानंतर काही त्रास होत असेल तर तातडीने उपचारसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्थाही करण्यात आली होती. लस घेतलेल्यांचे आधार लिकिंग होणार आहे.इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात ड्रायरनचा शुभारंभ प्रतिक जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय.बी कांबळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्यSangliसांगली