शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा, युवतीचा विनयभंग करत कुटुंबियांना केली मारहाण

By शीतल पाटील | Updated: October 24, 2022 18:18 IST

एकतर्फी प्रेमातून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे सांगून युवतीचा विनयभंग केला.

सांगली : शहरातील एका युवतीच्या घरात काल, रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मद्यपी प्रियकराने धिंगाणा घालून युवतीचा विनयभंग केला. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.सांगली-कोल्हापूर रस्ता परिसरात राहणाऱ्या रोशन खंदारे (वय २४) या युवकाचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. रविवारी रात्री तो दारू ढोसून मध्यरात्री अडीचच्या सुमारास युवतीच्या घरी गेला. घराचे बंद दार मोठमोठ्याने ठोठावून त्याने आरडाओरडा केला. दार उघडत नसल्याचे पाहताच त्याने दारावर दगड फेकून मारण्यास सुरवात केली. पहाटेच्या सुमारास अचानक आरडाओरड्याचा आवाज आल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले.या कालावधीत तिच्या आईने दरवाजा उघडला. प्रेमी युवकाने आईस ढकलले आणि घरात प्रवेश केला. आतमध्ये गेल्यावर ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे सांगून युवतीचा विनयभंग केला. यामुळे चिडलेल्या युवतीने त्याला ढकलून दिले. याचा राग येऊन त्याने तिच्या कानफटात मारली. भांडण सोडविण्याकरिता तिचे वडील आणि भाऊ मध्ये पडले असता दोघांनाही त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार अर्ध्या तासाहून अधिक वेळ सुरू होता. याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस