तासगाव : तासगाव शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी भागात मंगळवारी रात्री दारूच्या नशेत जगन चरण पवार (वय ४४) या मुलाने स्वतःच्या आई शांताबाई चरण पवार (७०) यांचा तलवारीने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शांताबाई पवार या आपल्या कुटुंबासोबत इंदिरानगर झोपडपट्टी भागात राहत होत्या. मंगळवारी रात्री जगन हा दारूच्या नशेत घरी आला. किरकोळ कारणावरून आईशी वाद झाला. वादाच्या दरम्यान संतापाच्या भरात त्याने घरातील तलवार काढून आईवर वार केला. या हल्ल्यात शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखालील तासगाव पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी जगन पवार याला तत्काळ ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने तासगाव शहरात हळहळ व्यक्त होत होती. पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In Tasgaon, Sangli, a drunken son, Jaggan Pawar, fatally stabbed his mother, Shantabai Pawar, with a sword following a minor argument. Police arrested Pawar, and an investigation is underway, causing grief in the city.
Web Summary : सांगली के तासगाँव में, जगन चरण पवार नामक एक नशे में धुत बेटे ने मामूली कहासुनी के बाद अपनी माँ शांताबाई चरण पवार की तलवार से वार कर हत्या कर दी। पुलिस ने पवार को गिरफ्तार कर लिया है, और शहर में शोक है।