शिराळ्यातून चोरीस गेलेली औषधे सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:30 IST2021-01-08T05:30:13+5:302021-01-08T05:30:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील औषध दुकानातून चोरीस गेलेली दीड ते दोन लाखांची औषधे मंगळवारी शिराळा पोलिसांना ...

Drugs stolen from Shirala were found | शिराळ्यातून चोरीस गेलेली औषधे सापडली

शिराळ्यातून चोरीस गेलेली औषधे सापडली

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : येथील औषध दुकानातून चोरीस गेलेली दीड ते दोन लाखांची औषधे मंगळवारी शिराळा पोलिसांना अंत्री बुद्रुक येथील निगडी फाट्यावर आढळून आली. मात्र, चोरीमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर मिळाला नाही.

सोमवार पेठ येथे विद्याधर कार्वेकर यांच्या मालकीचे कार्वेकर औषध दुकान आहे. चोरट्यांनी रविवारी रात्री या दुकानाच्या दाराची कडी उचकटून औषधे पोत्यात भरून तसेच दोन हजार रुपये रोख व डीव्हीआर चोरून नेले होते.

याबाबत कार्वेकर यांनी शिराळा पोलिसांत वर्दी दिली होती. चोरीच्या तपासासाठी ठसे तज्ज्ञ व श्वानपथक मागविण्यात आले होते.

मंगळवारी सकाळी कार्वेकर यांना अज्ञाताकडून मोबाईलवर फोन आला. त्यांच्या दुकानाचे स्टिकर असलेली औषधे असणारे पोते चौकात दिसत आहे, असे दूरध्वनीवरील व्यक्तीने सांगितले. यानंतर त्या ठिकाणी पोलिसांसह गेले असता चोरीची औषधे भरलेले पोते आढळून आले. मात्र, डीव्हीआर मिळून आला नाही.

सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, हवालदार डी. एस. खोमणे तपास करीत आहेत. मुख्य बाजारपेठेत वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात पोलीस चौकी उभी करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Drugs stolen from Shirala were found