शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विटा परिसरात नशेच्या इंजेक्शनची तस्करी, चौघांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:24 IST

कडेगाव पोलिसांची कारवाई, तपास करून प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज

कडेगाव : विटा ते पुसेसावळी रस्त्यावरील नेवरी (ता. कडेगाव) येथे गुंगीकारक व नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या टोळीला कडेगाव पोलिसांनी रविवारी सायंकाळी जेरबंद केले. संशयित रोहित हणमंत शिंदे (वय २३, शाहूनगर, विटा), राजीव विठ्ठल हारूगडे (वय २३, रा. विवेकानंदनगर, विटा), विशाल आनंदा चव्हाण (वय २८, रा. नेवरी नाका, विटा), शुभम राजू भागवत (वय २८, रा. महात्मा गांधी शाळेजवळ, विटा) या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून नशेच्या इंजेक्शनचा साठा, दोन मोटारी असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.विटा ते पुसेसावळी रस्त्यावरील नेवरी गावाजवळ रविवारी सायंकाळी चौघेजण गुंगीकारक व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी मोटारीतून येणार होते. कडेगाव पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. काही वेळात दोन मोटारीतून चौघेजण आले. संशयावरून त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी मोटार (एमएच ०९ डीएम ८०८५) ची झडती घेतली. तेव्हा एका पिशवीमध्ये काचेच्या १५ सीलबंद इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या. या इंजेक्शनचा साठा व विक्रीबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. कसून चौकशी केल्यानंतर शरीरसौष्ठवपटू याचा अवैधरित्या वापर करत असल्याचे सांगितले.पोलिसांच्या चौकशीत संशयित रोहित शिंदे व राजीव हारूगडे हे दोघेजण विशाल चव्हाण व शुभम भागवत या दोघांना इंजेक्शनची विक्री करणार असल्याचे समजले. पोलिसांनी नशेच्या इंजेक्शनच्या १५ बाटल्या, मोटार (एमएच ०९ डीएम ८०८५), मोटार (एमएच १२ डीएस ४६३७), चार महागडे मोबाइल असा १० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस हवालदार अमोल नायर यांनी याबाबत कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौघांविरूद्ध बीएनएस १२३, २७८ तसेच औषधी द्रव्य व सौंदर्यप्रसाधने कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशेखोरीचे विटा कनेक्शनजानेवारी महिन्यात विटाजवळील कार्वे येथे एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले होते. ३० कोटीचा ड्रग्ज साठा जप्त केला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा विट्यातील चौघांना नशेच्या इंजेक्शनप्रकरणी अटक केल्यामुळे नशेखोरीचे कनेक्शन उघडकीस आले आहे.

इंजेक्शनची दुपटीने विक्रीकाही शरीरसौष्ठवपटू व्यायामासाठी नशेच्या इंजेक्शनचा वापर करतात. साधारणपणे तीनशे रुपयांच्या इंजेक्शनची सहाशे ते आठशे रुपयांना विक्री केली जाते, असे तपासात पुढे आले आहे.

मुळाशी जाणार काय?नशेचे इंजेक्शन संशयितांनी कोठून आणले. तसेच या तस्करांच्या साखळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? याचा तपास करून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. त्यामुळे पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.