शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

सांगली जिल्ह्यात दुष्काळ! सव्वा लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा; मार्चमध्ये तीव्रता वाढण्याची चिन्हे

By संतोष भिसे | Updated: February 12, 2024 18:00 IST

संतोष भिसे सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ ...

संतोष भिसे

सांगली : यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये टंचाईस्थिती वाढू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ५३ गावे आणि ३९२ वाड्यावस्त्यांना टंचाईची झळ बसू लागली आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरात सुमारे सव्वा लाख लोकसंख्येला ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जून ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ६८ टक्केच पाऊस झाला. दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीला जीवदान दिले. पिके वाचली; पण पिण्याच्या पाण्यासाठी या पावसाचा उपयोग झाला नाही. राज्यात सर्वांत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे. दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतही टंचाई जाणवू लागली आहे. आजमितीस जत आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यांत मिळून ५३ गावांना ५३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यामध्ये जत तालुक्यातील ५०, तर आटपाडी तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक आणि खानापूर तालुक्यातील तीन गावांतही पाणीटंचाई आहे; पण तेथे अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जत तालुक्यातील एक लाख १९ हजार ९२१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅंकर सुरू असलेली तालुकानिहाय गावेजत : निगडी खुर्द, शेड्याळ, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव १, जाडरबोबलाद, काराजनगी, बेळोंडगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खुर्द, कागनरी, दरीबडची, कोळेगिरी, कोंत्येवबोबलाद, लमाणतांडा (दरीबडची), केरेवाडी (कोंत्येवबोबलाद), व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, करेवाडी (तिकोंडी), दरीकोन्नूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजानवाडी, तिल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, मोटेवाडी, भिवर्गी, मल्याळ - प्रत्येकी १. सिंदूर, सोन्याळ, संख, उमराणी, तिकोंडी, माडग्याळ - प्रत्येकी २. एकूण टँकर : ५०आटपाडी : आंबेवाडी, पूजारवाडी, विठलापूर - उंबरगाव प्रत्येकी १. एकूण टँकर : ०३

म्हैसाळ योजनेने तारलेसध्या म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणीउपसा सुरू असून जत तालुक्यात पाणी पोहोचले आहे. या पाण्यामुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांतील बहुतांश गावांच्या पाझर तलावांत पाणी टिकून आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तूर्त तरी नाही. अर्थात, मार्चअखेरपासून टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळ