पलूस शहरावर ड्रोन कमेऱ्याने पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST2021-04-30T04:33:59+5:302021-04-30T04:33:59+5:30

फोटोओळ : पलूस येथे ड्रोन कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक घेताना तहसीलदार निवास ढाणे, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव उपस्थित होते. पलूस ...

Drones patrol the city of Palus | पलूस शहरावर ड्रोन कमेऱ्याने पाळत

पलूस शहरावर ड्रोन कमेऱ्याने पाळत

फोटोओळ : पलूस येथे ड्रोन कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक घेताना तहसीलदार निवास ढाणे, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव उपस्थित होते.

पलूस : पलूस शहरावर आजपासून ड्रोन कमेऱ्याने लक्ष ठेवले जाणार आहे.

पलूस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था सांभाळावी यासाठी आजवर अनेक कठोर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

आता कोरोनाच्या काळात शासकीय नियमांचे उल्लंघन करणारे, विनामस्क फिरणारे, तसेच अवैधरीत्या केले जाणाऱ्या कामांवर ड्रोन कमेऱ्याचा पहारा ठेवला जाणार आहे. या ड्रोनला हाय रिझोल्युशन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी ही गस्त घालणे सोयीचे होणार आहे. यामुळे पोलिसांचे बहुतांशी काम सोपे होणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अजून मजबूत यंत्रणा उभी करणे सोपे होईल, असा विश्वास विकास जाधव यांनी व्यक्त केला.

कोरोनाचे नियम तंतोतंत पाळून प्रशासनाला सहकार्य करून कारवाईपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: Drones patrol the city of Palus