कुपवाडमधील हुल्लडबाजांवर राहणार ड्रोनची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:27 IST2021-04-22T04:27:20+5:302021-04-22T04:27:20+5:30
फोटो ओळ : कुपवाडमध्ये संचारबंदीच्या काळात विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे सहायक पोलीस निरीक्षक निरज उबाळे व इतर कर्मचारी करडी ...

कुपवाडमधील हुल्लडबाजांवर राहणार ड्रोनची करडी नजर
फोटो ओळ : कुपवाडमध्ये संचारबंदीच्या काळात विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे सहायक पोलीस निरीक्षक निरज उबाळे व इतर कर्मचारी करडी नजर ठेऊन आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात शहर परिसरातून विनाकारण मोकाट फिरणाऱ्या हुल्लडबाज तरुणांवर आता कुपवाड एमआयडीसी पोलिसाची ड्रोनद्वारे करडी नजर राहणार आहे. परिसरात विनाकारण मोकाट फिरणारे व गर्दी करून थांबणाऱ्यांचे ड्रोनद्वारे छायाचित्रण करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कुपवाड एमआयडीसी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळेच कुपवाड पोलिसांकडून पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. कुपवाड पोलिसांकडून बुधवारी कुपवाड परिसरातून ड्रोन कॅमेरा सोडण्यात आला. सोसायटी चौक, आर. पी. पाटील शाळा, दर्गा चौक परिसरातील मोकाट फिरणारे व गर्दी करून थांबणाऱ्यांचे याद्वारे छायाचित्रण करण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक निरज उबाळे म्हणाले की, काही नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहेत. एकत्र येण्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. नियम मोडणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.