वाहनचालकांनी स्वत:सोबतच इतरांची काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:53+5:302021-02-05T07:21:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. वाहन चालविताना स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, असे प्रतिपादन अभिनेत्री शिवाणी ...

वाहनचालकांनी स्वत:सोबतच इतरांची काळजी घ्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. वाहन चालविताना स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, असे प्रतिपादन अभिनेत्री शिवाणी सोनार यांनी केले. जिल्हा पोलीस दल आणि वाहतूक शाखेच्या वतीने ३२व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कर्मवीर चौकात प्रबोधनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अभिनेते मनीराज पवार उपस्थित होते.
अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळावे. जिल्ह्यात जे ३६ ब्लॅक स्पॉट आढळून आले आहेत त्या ठिकाणी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. गतवर्षी अपघाताचे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी झाले आहे. तर कोरोनाच्या कालावधीत हेच प्रमाण ५० टक्के कमी झाले आहे.
या कार्यक्रमादरम्यान जे वाहनचालक हेल्मेट परिधान करून रस्त्यावरून जात होते त्यांचा गुलाबाचे फूल देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास पोलीस उपाधीक्षक अजित टिके, किशोर काळे, अशोक विरकर, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख, मिरज वाहतूक शाखेचे अनिल माने, वाहतूक शाखेकडील सुनील राऊत, सुनीता धुमाळे, विठ्ठल चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी या दोन्ही कलाकारांनी शहरात दुचाकीवरून फेरफटका मारत वाहतुकीचे नियम पाळण्याची आवाहन केले.