शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार ६०६ जागांसाठी चालक-वाहकांची भरती, सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:45 IST

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील मेगाभरती काढल्यानंतर एसटी महामंडळाने उर्वरित नऊ जिल्ह्यांसाठी ३,६०६ चालक तथा वाहक पदांसाठी जाहिरात काढली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांंसाठी १ हजार ६५८ जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागा आहेत.

ठळक मुद्दे३ हजार ६०६ जागांसाठी चालक-वाहकांची भरती, सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागानऊ जिल्ह्यांसाठी भरती

कोल्हापूर : दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील मेगाभरती काढल्यानंतर एसटी महामंडळाने उर्वरित नऊ जिल्ह्यांसाठी ३,६०६ चालक तथा वाहक पदांसाठी जाहिरात काढली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांंसाठी १ हजार ६५८ जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त जागा आहेत.एसटी महामंडळाकडून चालक तथा वाहकांची भरती केली जाणार आहे. या पदांवरील कर्मचाऱ्यांनी दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने खर्चावर नियंत्रण आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार येत्या काही वर्षांत, काही एसटी बसवर वाहक न नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच महामंडळाकडून वाहकाची जबाबदारीही चालकावरच दिली जाणार आहे.एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर  बुधवारपासून ही माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे; त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मिळून तब्बल ८०२२ चालक तथा वाहक पदांची भरती करण्यासाठीची जाहिरात एसटी महामंडळाकडून प्रसारित करण्यात आली आहे. अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व वर्धा अशा नऊ जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. एकाच ठिकाणी परीक्षा देता येणारदुष्काळग्रस्त १२ जिल्हे व सध्या जाहिरात प्रसिद्ध झालेल्या नऊ जिल्ह्यांतील उमेदवारांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे; त्यामुळे एका उमेदवाराला केवळ एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार आहे.कागदपत्रे...चालक तथा वाहक पदांसाठी अवजड वाहन परवाना, इयत्ता १0 वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव आणि चालक-वाहकसाठी आवश्यक असणाऱ्या परिवहन विभागाचा अधिकृत बिल्ला असणे आवश्यक आहे.अशा आहेत रिक्त जागाजिल्हा           एकूण जागासांगली             ७६१सातारा            ५१४कोल्हापूर         ३८३ 

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSangliसांगली