आष्ट्यात मोटारसायकलची नासधूस करून चालकाचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:29 IST2021-05-20T04:29:16+5:302021-05-20T04:29:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा बसस्थानक चौकात बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान अज्ञात वाहनचालकाने पोलिसांच्या भीतीने मोटरसायकलची नासधूस करीत ...

The driver escaped by destroying the motorcycle in Ashta | आष्ट्यात मोटारसायकलची नासधूस करून चालकाचे पलायन

आष्ट्यात मोटारसायकलची नासधूस करून चालकाचे पलायन

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा बसस्थानक चौकात बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान अज्ञात वाहनचालकाने पोलिसांच्या भीतीने मोटरसायकलची नासधूस करीत पळ काढल्याची चर्चा शहरात आहे.

याबाबत माहिती अशी की, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आष्टा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी दुपारी दुधगाव नाका येथे एका मोटारसायकल चालकाला अडवण्यात आले. त्यानंतर तो एसटी स्टँड चौकात आला. या ठिकाणी पोलिसांनी त्याला थांबविले. संबंधित मोटारसायकल चालकाने पोलिसांशी वाद घालत गाडी तिथेच टाकून पळ काढला. थोड्यावेळाने आपल्या हातावर ब्लेडने वार केले. गाडीची शीट निघून पडल्याने गाडीची मोडतोड करून यामध्ये असणारे हत्यार घेऊन त्याने पळ काढला. काही कळण्या अगोदरच घटना घडल्याने पोलिसांच्याही लक्षात आले नाही. लोकांनी संबंधित चालकाने पलायन केल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर पोलीस व होमगार्ड त्याच्या पाठीमागे लागले, परंतु तो सापडला नाही. याची शहरात चर्चा सुरू होती.

Web Title: The driver escaped by destroying the motorcycle in Ashta