शिराळा तालुक्यात लवकरच ‘ठिबक’चा पायलट प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:57+5:302021-01-20T04:27:57+5:30

शिराळा : राज्यातील पायलट प्रकल्प म्हणून शिराळा तालुक्यात लवकरच ठिबक सिंचन प्रकल्प होणार आहे, असे प्रतिपादन श्रमिक ...

Drip pilot project in Shirala taluka soon | शिराळा तालुक्यात लवकरच ‘ठिबक’चा पायलट प्रकल्प

शिराळा तालुक्यात लवकरच ‘ठिबक’चा पायलट प्रकल्प

शिराळा : राज्यातील पायलट प्रकल्प म्हणून शिराळा तालुक्यात लवकरच ठिबक सिंचन प्रकल्प होणार आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर केले.

शिराळा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती हाेती. तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि पाणीवापर संस्थांचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले की, बंद पाइपलाइन व ठिबक सिंचनसंदर्भात श्रमिक मुक्ती दलाने धोरणात्मक निर्णय शासनाला पटवून दिला असून, यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याची बचत, जादा पाण्यामुळे होणारे नुकसान टळेल. खर्चाची बचत आणि उत्पन्नात वाढ होणार असून, चढाकडील वंचित क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे हा प्रयोग राज्यात पथदर्शी आहे.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, येत्या २० फेब्रुवारीपर्यंत या पथदर्शी प्रकल्पाचा आराखडा जलसंपदा विभागाने पूर्ण करावा.

यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक करून शासनाकडून निधी उपलब्ध करू. यावेळी जलसंपदा सिंचनचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील. जयंत निकम, दिलीप पाटील पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी शिवाजी चौगुले, विष्णू पाटील, बाळासाहेब नांगरे, सरपंच विजय पाटील आदींसह पाणीवापर संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Drip pilot project in Shirala taluka soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.