पेयजल योजनेमुळे मुबलक पाणी मिळेल
By Admin | Updated: September 2, 2014 23:59 IST2014-09-02T23:59:46+5:302014-09-02T23:59:46+5:30
जयंत पाटील : बामणोली नळपाणी पुरवठा योजना

पेयजल योजनेमुळे मुबलक पाणी मिळेल
कुपवाड : पुनर्वसित बामणोलीतील ग्रामस्थांना राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे मुबलक प्रमाणात पाणी मिळणार असून, गावाचा पाणीप्रश्नही कायमचा सुटणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आज केले़
बामणोली (ता़ मिरज) येथे ग्रामपंचायतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते़ कार्यक्रमास माजी आमदार दिनकर पाटील, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, उपसरपंच अंकुश चव्हाण, तुकाराम बामणे, सुभाष चिंचकर, शशिकांत शिंदे प्रमुख उपस्थित होते़
यावेळी ग्रामविकासमंत्री पाटील पुढे म्हणाले की, पुनर्वसित बामणोलीच्या विकासासाठी मंजूर झालेली ही पाणी योजना यशस्वीपणे राबवावी, चांगल्या दर्जाचे काम व्हावे़
माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली़ शशिकांत शिंदे यांनी स्वागत केले़ उपसरपंच अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविकात, बामणोली पाणी योजनेसाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला असून, त्यातून पाईपलाईन, पाण्याच्या टाकीसह इतर विविध कामे केली जाणार असल्याची माहिती दिली़
रवींद्र शिंदे यांनी आभार मानले़ यावेळी सुभाष चिंचकर यांचा सत्कार करण्यात आला़ विघ्नहर्ता ग्रुपच्यावतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले़ कार्यक्रमास सरपंच सजाताई सावंत, विलास चव्हाण, भालचंद्र पाटील, नगरसेवक शेडजी मोहिते, विष्णू माने, राजू गवळी, इब्राहीम चौधरी, राहुल पवार, जगन्नाथ पाटील, संभाजी जाधव यांच्यासह या परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते़ (वार्ताहर)