मिरजेत डाॅ. कुलकर्णी ॲडव्हान्स एण्डोस्कोपी सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:37+5:302021-02-09T04:29:37+5:30

मुंबई, हैदराबाद यासह मोठ्या शहरातच उपलब्ध असलेली पोटविकारावरील अत्याधुनिक उपचारपद्धती गॅस्ट्रोएण्ट्रोलाॅजी तज्ज्ञ डाॅ. सुजय अशोक कुलकर्णी यांनी मिरजेत ...

Dr. Miraj Inauguration of Kulkarni Advanced Endoscopy Center | मिरजेत डाॅ. कुलकर्णी ॲडव्हान्स एण्डोस्कोपी सेंटरचे उद्घाटन

मिरजेत डाॅ. कुलकर्णी ॲडव्हान्स एण्डोस्कोपी सेंटरचे उद्घाटन

मुंबई, हैदराबाद यासह मोठ्या शहरातच उपलब्ध असलेली पोटविकारावरील अत्याधुनिक उपचारपद्धती गॅस्ट्रोएण्ट्रोलाॅजी तज्ज्ञ डाॅ. सुजय अशोक कुलकर्णी यांनी मिरजेत उपलब्ध केली आहे. डॉ. सुजय कुलकर्णी यांनी एमडी मेडिसिन ही पदवी घेऊन एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएण्टरोलाॅजी हैदराबाद येथे पद्मभूषण डाॅ. डी नागेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षे पोटविकारतज्ज्ञ म्हणून काम केले आहे. अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, लिव्हर, पित्ताशय स्वादुपिंडाच्या आजाराचे एण्डोस्कोपीद्धारे निदान व उपचार करण्यांत ते तज्ज्ञ आहेत. आतापर्यंत त्यांनी पंधरा हजारावर शस्रक्रिया केल्या आहेत. मिरजेत प्रथमच गॅस्ट्रोएण्ट्रोलाॅजी तज्ज्ञामार्फत पोटविकारावर उपचार उपलब्ध झाल्याने रुग्णांची सोय झाली आहे. एलपीआर जीएल एण्डोस्कोपी व कोलोनोस्कोपी, ट्यूब प्लेसमेंट, परक्युटेनियस एण्डोस्कोपिक गॅस्ट्रोस्टॉमी ट्यूब प्लेसमेंट, मेटलिक स्टेंट प्लेसमेंट, हेमोरॉइडियल बॅन्डिंग, पॉलिपेक्टॉमी, एण्डोस्कोपिक म्यूकोसल रीसेक्शन, पित्तसंबंधित सायटोलॉजी, एण्टरोस्कोपीद्वारे लहान आतड्यांची तपासणी येथे उपलब्ध आहे.

डाॅ. सुजय कुलकर्णी, डाॅ. अशोक कुलकर्णी, डाॅ. वनिता कुलकर्णी यांनी स्वागत केले. याप्रसंगी डाॅ. नथानिएल ससे, डाॅ. जी.एस. कुलकर्णी, डाॅ. मोहन भट, डाॅ. विनोद परमशेट्टी, डाॅ. विक्रमसिंह जाधव, डाॅ. विक्रांत मगदूम, डाॅ. मिलिंद पारिख, डाॅ. उत्तम कुंभार, डाॅ. भालचंद्र पाटील, डाॅ. अविनाश दोरकर, डाॅ. चंद्रशेखर हळींगळे, नगसेवक संदीप आवटी, मोहन व्हनखंडे, समीर मालगावे, रवि शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फाेटाे : ०८ मिरज २

Web Title: Dr. Miraj Inauguration of Kulkarni Advanced Endoscopy Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.