डॉ. गेल ऑम्वेट यांना अखेरचा लाल सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:00+5:302021-08-27T04:29:00+5:30

फोटो : २६०८२०२१-एसएएन०२ : डॉ. गेल ऑम्वेट यांच्यावर गुरुवारी कासेगाव (ता. वाळवा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या प्राची ...

Dr. Last red salute to Gail Omvet | डॉ. गेल ऑम्वेट यांना अखेरचा लाल सलाम

डॉ. गेल ऑम्वेट यांना अखेरचा लाल सलाम

फोटो : २६०८२०२१-एसएएन०२ : डॉ. गेल ऑम्वेट यांच्यावर गुरुवारी कासेगाव (ता. वाळवा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या प्राची यांनी मुखाग्नी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क

कासेगाव : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, थोर पुरोगामी विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट यांच्यावर गुरुवारी कासेगाव (ता. वाळवा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या प्राची यांनी मुखाग्नी दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. ‘अमर रहे, अमर रहे, डॉ. गेल ऑम्वेट अमर रहे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्यभरातून आलेल्या विविध चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांना अखेरचा लाल सलाम केला.

दिवंगत स्वातंत्रसेनानी क्रांतिवीर बाबूजी पाटणकर आणि क्रांतिवीरांगना इंदूताई पाटणकर यांची स्नुषा, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या पत्नी प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट ऊर्फ शलाका पाटणकर यांचे बुधवारी (दि. २५) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर कासेगाव येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी कासेगाव येथे फुलांनी सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी राज्यभरातून अनेक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी चळवळीतील गीते मोठ्या उत्स्फूर्तपणे गायली. अंत्ययात्रा संपूर्ण गावातून निघाली. क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय प्रबोधन संस्थेसमोरच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या प्राची यांनी साश्रूनयनांनी त्यांना मुखाग्नी दिला. डॉ. भारत पाटणकरही भावनाविवश झाले.

यावेळी कॉ. धनाजी गुरव, डॉ. उदय नारकर, यशवंतराव बाबर, संपतराव पवार, माजी सभापती हणमंतराव पाटील, प्रा. के. बी. पाटील, भारत पाटील, सुभाष पाटील, सचिन पाटील, ॲड. संदीप पाटील, नामदेव गावडे, प्रदीप कांबळे, राहुल थोरात, संपतराव मोरे, लक्ष्मण शिंदे, सुबोध मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. Last red salute to Gail Omvet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.