डॉ. गेल ऑम्वेट यांच्या श्रद्धांजली सभेत होणार पुस्तकांचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:33+5:302021-09-04T04:32:33+5:30
कासेगाव : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिकमुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्यासाठी आदरांजली सभा ...

डॉ. गेल ऑम्वेट यांच्या श्रद्धांजली सभेत होणार पुस्तकांचे प्रकाशन
कासेगाव : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिकमुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्यासाठी आदरांजली सभा आयोजित केली आहे. रविवारी (दि. ५) कासेगाव (ता. वाळवा) येथे दुपारी १ वाजता राजारामबापू पाटील सभागृह तथा पदयात्रीमध्ये ती होईल. राज्यातील विविध परिवर्तनवादी पक्ष, स्त्रीमुक्ती संघटना, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक आणि विविध चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. गेल यांच्यावर डॉ. भारत पाटणकर यांनी लिहिलेल्या कविता संग्रहाचे प्रकाशन होईल. येशू पाटील यांच्या ‘सखी’ काव्यसंग्रहाचेही प्रकाशन होईल. शरद अष्टेकर यांनी डॉ. गेल यांच्या ‘आंबेडकर टुवर्ड्स एनलायटंड इंडिया’ या इंग्रजी ग्रंथाचे मराठी भाषांतर केले आहे. त्या ‘आंबेडकर- प्रबुद्ध भारताच्या दिशेने’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशनही होईल.