शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली येथील प्राणी गणनेबाबत उदासीनता; सागरेश्वर, राधानगरी अभयारण्यात मात्र होणार गणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:57 IST

वनविभाग अद्याप संभ्रमात

आनंदा सुतारवारणावती : अभयारण्यातील वनक्षेत्रातील प्राण्यांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागामार्फत दरवर्षी सर्वाधिक प्रकाश असलेल्या रात्री म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच विष्ठा आणि ठशांचा अभ्यास करून वन्य प्राण्यांची गणना केली जाते. पण, यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात होणारी प्राणी गणना होणार की नाही याबाबत शंका बळावत आहे.यंदाच्या प्राणी गणनेबाबत वन विभागाची उदासीनता असल्याची चर्चा प्राणीमित्र व नागरिकांतून चांदोली परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. याचे कारण असे बुद्ध पौर्णिमेच्या अगोदर आठ ते पंधरा दिवस वन विभागामार्फत प्राणी गणनेस येणाऱ्या प्राणी मित्रांची नावे नोंदवली जातात. त्यांना वन अधिकाऱ्यांबरोबर अभयारण्यात प्राणी गणनेसाठी घेऊन गेले जाते.व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात झालेली विभागणी तसेच, अधिकाऱ्यांची कर्तव्यातील चालढकल या गोष्टींच्या अभावाने चांदोलीत २२ व २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणी गणना थांबणार की काय? अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यालयाकडून मिळाली.

वनविभाग अद्याप संभ्रमातमागील चार दिवसांपासून कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोलीस्थित उप विभागीय वन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, कार्यालयातून कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसून दोन दिवसांत काही माहिती मिळाल्यास कळवले जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना होणार असल्याची माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग