शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मिरज-पुणे रेल्वे मार्गाचे २१३ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण

By अशोक डोंबाळे | Updated: February 24, 2024 16:41 IST

सातारा ते कऱ्हाडदरम्यान १८ किलोमीटर लांबीची चाचणी पूर्ण, येत्या वर्षभरात उर्वरित ६७ किलोमीटरचे दुहेरीकरण होणार

मिरज : सातारा ते कऱ्हाडदरम्यान तारगाव-मसूर-शिरवडे दरम्यान १८ किलाेमीटर लांबीच्या दुहेरीकरणाची चाचणी पूर्ण झाल्याने मिरज-पुणेरेल्वे मार्गाचे २१३ किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.मध्य रेल्वेने मिरज-पुणे या २८० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम २०१६ मध्ये सुरू केले. मे २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. जुन्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले; मात्र सातारा व पुणे जिल्ह्यात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या हरकती व इतर अडचणींमुळे दुहेरीकरणाच्या कामास वर्षभराचा विलंब झाला. तारगाव-मसूर व मसूर-शिरवडे अशा दोन टप्प्यातील १८ किलाेमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने शिरवडे ते तारगाव दरम्यान वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त १३१ किलाेमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलाेमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे. टप्प्याटप्प्याने हा वेग ११० किलाेमीटर प्रतितास होणार आहे. कऱ्हाड ते सांगली दरम्यान सुमारे ४० किलाेमीटर दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. तारगाव ते शिरवडे हा १८ किलाेमीटर मार्ग सुरू झाल्याने पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या २८० किलाेमीटरपैकी २१३ किलाेमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तयार झालेल्या २१३ किलाेमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. उर्वरित ६७ किलाेमीटर दुहेरीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससह अन्य जादा रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPuneपुणेrailwayरेल्वे