काळजी करू नका कोरोनाची, काळजी घ्या स्वतःची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST2021-04-10T04:25:49+5:302021-04-10T04:25:49+5:30

काय आहेत या गोष्टी? : पहाटे लवकर म्हणजे चार ते सहा या वेळेत उठा. रोज सकाळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने किमान ...

Don't worry Corona, take care of yourself | काळजी करू नका कोरोनाची, काळजी घ्या स्वतःची

काळजी करू नका कोरोनाची, काळजी घ्या स्वतःची

काय आहेत या गोष्टी? : पहाटे लवकर म्हणजे चार ते सहा या वेळेत उठा. रोज सकाळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने किमान अर्धा ते एक तास योग व प्राणायाम करा. नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण वेळेतच करा. पित्ताचा त्रास नसल्यास जेवणानंतर पान, बडीशेप खा. शतपावली करा. किमान अर्धा तास डाव्या कुशीवर आडवे पडा. नंतरच नित्यकर्मे सुरू करा. जेवताना व जेवणानंतर मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. रात्रीचे जेवण लवकर आटोपून लवकर झोपी जा. चहा जास्त पिऊ नका, चहाचे अगदीच व्यसन असेल तर अर्धा-अर्धा कप एक-दोनदा ठीक आहे. त्याऐवजी आवळ्याचे, वाळ्याचे, लिंबाचे सरबत प्या. सीताफळ, डाळिंब, मोसंबी, कलिंगड या फळांचा रस प्यावा.

गरम अथवा कोमट दूध शक्यतो सकाळी प्यावे. रात्री झोपताना पिऊ नये. दही, ताक थंड असल्याच्या गैरसमजुतीने अतिसेवन करू नका. या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळा. मिसळ, पावभाजी, वडा-सांबर, पुरीभाजी यासारखे तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ शक्यतो टाळा. फ्रिजमधील अतिथंड पाणी अजिबात पिऊ नये, शीतपेयांऐवजी लिंबू सरबत, फळांचे रस, पन्हे घ्यावे. अतिप्रमाणात आईसक्रीम खाऊ नका. वेळ मिळत नाही म्हणून वाट्टेल तेव्हा व्यायाम करणे कधीही निषिद्ध. ‘प्रोटीन सप्लिमेंट’ उष्ण असल्याने घेऊ नका, त्यामुळे उष्णतेचे विकार आणखी वाढतात. त्याऐवजी सत्तू या देशी प्रोटीनचा वापर करावा.

योग्य जीवनशैली म्हणजे आणखी दुसरे-तिसरे काहीच नसते; पण आजकाल एवढेसुद्धा जमत नाही, पण कोरोनाने हे जमविण्याची आठवण करून दिली आहे. मास्क, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर पाळा. मानसिक ताणतणावाचे नियोजन करा. कोरोनाला नक्कीच दूर ठेवण्यात आपण यशस्वी होऊ.

- डॉ. अमोल पाटील, सांगली.

Web Title: Don't worry Corona, take care of yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.