वीज बिलांबाबत सक्ती करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST2021-06-23T04:17:59+5:302021-06-23T04:17:59+5:30

सांगली : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत वीज बिले सक्तीने किंवा कारवाईच्या भीतीने भरून ...

Don't force electricity bills | वीज बिलांबाबत सक्ती करू नये

वीज बिलांबाबत सक्ती करू नये

सांगली : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत वीज बिले सक्तीने किंवा कारवाईच्या भीतीने भरून घेऊ नयेत, अशी मागणी राष्ट्र विकास युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन सदामते यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, लोकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असताना त्यांना वीज बिलांसाठी सक्ती करणे चुकीचे आहे. बऱ्याच ठिकाणी बिले भरली नाहीत म्हणून कनेक्शन तोडली जात आहेत. अशा घरांमधील मुलांचे ऑनलाइन शिक्षण थांबले आहे. विजेअभावी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे वीज बिल भरण्याची मुभा देण्यात यावी. काही टप्पे पाडूनही त्यांना सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर विनोद मोरे, सुरेश वडर, विवेकानंद देशपांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Don't force electricity bills